कोणाचं डोकं कसं चालेल आणि आपलं पोट भरण्यासाठी कोण कसा मार्ग काढेल याचा नेम नाही. पॅरिसमध्ये नुकतीच एका तरूणाला अटक करण्यात आली असून तो शो ऑफ करण्यासाठी चक्क सिंहाचा छावा लोकांना द्यायचा आणि त्याबदल्यात पैसे घायचा. अशा प्रकारे या मुक्या प्राण्याचा सौदा करून या तरूणाने खूप पैसे कमावले. पोलिसांपासून लपवून त्याचा हा व्यवसाय सुरू होता. पण पॅरिसमधल्या अनेक तरुणांचे छाव्यासोबत व्हायरल होणारे फोटो पाहून पोलिसांना शंका आली. त्यांनी या प्रकरणाचा छडा लावला आणि ही धक्कादायक बाब उघडकीस आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : डव्हच्या ‘त्या’ वादग्रस्त जाहिरातीतली कृष्णवर्णीय मॉडेल म्हणते..

जेव्हा पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा छाव्याला तसंच टाकून तो पळून गेला होता. नंतर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं. पॅरिसमधल्या अनेक श्रीमंताना आणि ड्रग माफियांना तो छावा द्यायचा. दिखावा करण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी अनेकजण तो सांगेल तितके पैसे मोजायला तयार व्हायचे त्यामुळे त्याचं सारं काही सुरळीत सुरु होतं. या सगळ्यात छाव्याचे मात्र चांगलेच हाल झाले. वेळेवर आणि योग्य खुराक न मिळाल्याने तो खूपच अशक्त झाला होता. पोलिसांनी या माणसाला अटक केली असून छाव्याला प्राणीप्रेमी संघटनेच्या स्वाधीन केले आहे.

सौदी अरेबिया सारख्या देशातही श्रीमंत लोक आणि सौदी राजपुत्र वाघ, सिंह यासारखे प्राणी पाळायचे. पण काही महिन्यांपूर्वीच सौदी सरकारने हिंस्त्र प्राणी पाळण्यावर बंदी घातली आहे.

लष्करी अधिकारी व्हायचं स्वप्न भंगलं अन् ‘ती’ टॅक्सी चालक झाली