आजकाल माणसांमध्ये माणुसकी हरवली आहे असे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना रोज आपल्या आसपास घडतात. सोशल मीडियावर अशा धक्कादायक घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात पण काही मोजक्या घटना अशा असतात ज्या माणूसकी अजूनही जिवंत आहे याची प्रचिती देतात. अनेकदा सोशल मीडियावर माणुसकीचे दर्शन घडवतात व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, एका नाल्यातमध्ये पडलेल्या गायीला वाचवण्यासाठी तरुणाने जे केले ते पाहून नेटकरी थक्क झाले आहे. व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर एक व्हिडीओमध्ये एका घाणेरड्या नाल्यात गाय अडकलेली दिसत आहे. गाय बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसते पण ती अपयाशी ठरते. नाल्यात अडकलेल्या गायीला वाचवण्यासाठी काही लोक अथक प्रयत्न करताना दिसत आहे. शेवटी एक तरुण नाल्यात उतरतो. नाल्यामध्ये कचरा आणि गटाराचे अस्वच्छ पाणी असूनही तो तरुण संकोच करत नाही. नाल्यात उतरून तो गायीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो पण त्यातही त्याला यश येत नाही. गाय बाहेर पडण्यासाठी धडपडत असते. गायीला सावरता सावरता तरुणाचा तोल गेला असता अन् तो नाल्याच्या पाण्यात पूर्ण बुडाला असता. शेवटी गायीला एका दोरखंडाने बांधतात. काही लोक गायीला दोरखंड ओढून बाहेर काढतात. नाल्यात असलेला तरुण गायीला वर ढकलतो आणि गाय नाल्याच्या बाहेर पडते. बाहेर पडताच गाय तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते पण तिचा दोरखंडात बांधलेले असल्याने ती तिथेच खाली बसते. नाल्यात उतरणारा तरुण बाहेर येतो, गायीच्या अंगावर हात फिरवून तिला शांत करतो. त्यानंतर दोरखंड सोडून तिला मुक्त केले जाते. व्हिडिओ पाहून अंगावर अक्षरश: काटा उभा राहतो.

वीरा सिंघमने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत २.४ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओने सोशल मीडिया वापरकर्त्यांना भावूक केले.

व्हिडिओ येथे पहा:

इंटरनेटने एकमताने वीराला खऱ्या आयुष्यातील हिरो घोषित केले. “हे मानवतेचे खरे कृत्य आहे,” एका वापरकर्त्याने म्हटले, तर दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “माणूसकी अजूनही जिवंत आहे. या मुलाने वारंवार गायीला मदत करण्यासाठी कसा त्याग पहा. हे मानव आणि प्राण्यांमधील (गायी) बंधन दर्शवते.”