शॉपिंग ही एक सामान्य गोष्ट आहे, जी अनेकांना करायला आवडते. पण यातील वेगळेपण असे आहे की, काही लोक छोट्या दुकानात जाऊन शॉपिंग करतात तर काही मॉल्समध्ये जातात. मॉलमधील सामान थोडा महाग असले तरी त्या सामानाला एक चांगली क्वॉलिटी असते. यामुळेच बहुतेक लोकांना मॉल्समधून शॉपिंग करायला आवडते. साधारणत: मॉलमध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी खास जागा असते, त्यामुळे शॉपिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण येत नाही, मात्र सध्या सोशल मीडियावर शॉपिंगशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही आश्चर्य व्यक्त कराल.
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती शॉपिंगसाठी मॉलमध्ये आला होता, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो चक्क घोड्यावर बसून शॉपिंगसाठी मॉलमध्ये पोहोचला होता, इतकेच नाहीतर घोड्यावर बसून तो मॉल फिरताना दिसला. मॉलमधील अनेक वस्तू त्याने घोड्यावरून बसून पाहिल्या.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती एका पांढऱ्या रंगाच्या घोड्यावर शॉपिंग मॉलमध्ये फिरत आहे. यावेळी त्याच्या हातात बादलीसारखे काहीतरी दिसतेय. कदाचित त्याने ती बादली मॉलमधून विकत घेतली असावी, पण याशिवाय तो आणखी काही खरेदी करताना दिसत नाही. हे मजेदार दृश्य पाहून अनेकांना हसू येत आहे. जेव्हा तो मॉलमधून बाहेर पडू लागला तेव्हा तिथे उपस्थित लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.
मजेदार व्हिडिओ पहा
हा मजेशीर व्हिडिओ टेक्सासचा असल्याचा दावा केला जात आहे. यात एक व्यक्ती येथील वॉलमार्ट शोरूममध्ये आली होती. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @MadVidss नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओला शेकडो लोकांनी लाईक करत विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणत आहे की, टेक्सासमध्ये हे सामान्य आहे, तर कोणी गंमतीने म्हणत आहे की, तो भाग्यवान आहे की, त्याच्या घोड्याने तेथे घाण केली नाही.