सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक व्यक्ती स्कूटीवरून चक्क सात मुलांना घेऊन जीवघेणा प्रवास करत आहे. एक मूल स्कूटीच्या मागे आणि दोन बाजूला उभी आहेत; तर दोन त्याच्या पुढे आणि दोन स्कूटीच्या मागच्या सीटवर बसलेली दिसतायत. तरी ती व्यक्ती अगदी आरामात या सर्व मुलांना घेऊन स्कूटी चालवत आहे. स्वत:सह मुलांचा जीव धोक्यात घालण्याचा हा एक प्रकार आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्या व्यक्तीविरोधात आता कारवाई केली आहे.

या जीवघेण्या राइडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी याची दखल घेत तपास सुरू केला. यावेळी हा व्हिडीओ ताडदेव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ताडदेव पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणी मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विट करत माहिती दिली की, आम्ही अशा प्रकारच्या राइडला सपोर्ट करत नाही. त्यातून चालक स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालत होता. त्यामुळे संबंधित आरोपीविरोधात आयपीसी ३०८ अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! एकाच स्कूटीवरून ७ जणांसह प्रवास; पाहा थरारक स्टंटचा Video

एका स्कूटीवर सात मुलांना घेऊन प्रवास

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती स्कूटीवरून सात मुलांना घेऊन प्रवास करत आहे. यावेळी स्कूटीच्या फूटबोर्डवर तीन मुले उभी, दोन मुले मागच्या सीटवर आणि दोन मुले स्कूटीच्या हँडलच्या समोर उभी आहेत. अशा प्रकारे चालक वगळता सात मुले स्कूटीवर जाताना दिसत आहेत.

Story img Loader