Viral Video: जर तुम्ही कामानिमित्त बाहेर जात असाल किंवा ऑफिसमधून परत घरी येत असता यादरम्यान रस्त्यावर अनेक गाड्यांची रहदारी सुरू असेल. यातच एखाद्या व्यक्तीने आपलं वाहन अगदी खासरीत्या सजवलं असेल, रिक्षाचालकाने रिक्षात गाणी लावली असतील किंवा एखादा बाईकचालक अगदीच वेगात गाडी चालवून तुमच्या जवळून गेला तर आपसूकच तुमची नजर त्याच्याकडे वळेल यात काही शंकाच नाही. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण रहदारीच्या रस्त्यावर, अनेक वाहनांच्यामध्ये एक चाक असलेली युनिसायकल Unicycle चालवताना दिसला आहे. Unicycle फक्त एका चाकांची असते, ज्याला पकडण्यासाठी हँडल नसून फक्त बसण्यासाठी एक सीट असते आणि ही फक्त चाकांच्या साहाय्याने चालवली जाते.
व्हायरल व्हिडीओ हैदराबादचा आहे. हैदराबादच्या काही कार आणि बाईक रस्त्यावरून जात होत्या, तेव्हा तरुण एक चाक असणारी सायकल संतुलित करताना दिसला आहे. ही सायकल चालवणं सोपं वाटत असलं तरी फक्त एका चाकावर उत्तम तोल राखणे आणि एखाद्या प्रो रायडरप्रमाणे अनेक गाड्यांच्या मधोमध चालवणे हे एका आव्हानापेक्षा कमी नाही. पण, हैदराबादमधील एका तरुणाने हे चांगलं करून दाखवलं आहे. एकदा पाहाच रहदारीच्या रस्त्यावर एका चाकावर सायकल चालवणारा सायकलस्वार.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, एकचाकी अनोखी सायकल चालवत सायकलस्वार स्वत:ला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. इंधनावर चालणाऱ्या वाहनांना मागे सोडत त्याचे सवारी कौशल्य दाखवतो आहे आणि उत्तम कामगिरी करत आहे. तसेच वळण घेतोय असे दर्शवण्यासाठी उजवा हात पुढे केला. तसेच व्हिडीओमध्ये कुठेही ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन न करता एका लेनवर काळजीपूर्वक सायकल चालवतानाही दिसला आहे.
सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @nomadguynextdoor या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी तरुणाच्या कौशल्याची प्रशंसा तर करीत आहेतच, पण त्याच्याबद्दल चिंताही व्यक्त करताना दिसून आले आहेत. कारण स्थानिक रस्त्यावर खड्डे आणि स्पीड ब्रेकर असल्यामुळे असे स्टंट करणे धोकादायक असू शकते, असेसुद्धा कमेंटमध्ये सांगताना दिसून आले आहेत. तसेच अनेक जणांनी ट्रॅफिकमध्ये सायकलस्वाराला त्याच्या परिपूर्ण प्रवासासाठी आनंद घेताना पाहून कौतुक केलं आहे. .