आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे लोक आपण पाहतो काही प्राण्यांवर प्रेम करणारे प्राणीप्रेमी आणि प्राण्यांना त्रास देणारे, अशा दोन्ही प्रकारचे लोक आपल्याला समाजात पाहायला मिळतात. काही जण प्राण्यांना अगदी जीवा प्माणे जपतात, आपल्या कुटुंबीयांप्रमाणे त्यांना प्रेम देतात आणि सांभाळ करतात. तर, काही जण मात्र याउलट असतात. ते रस्त्याने जात असतानाही विनाकारण प्राण्यांना त्रास देतात. असाच एक व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये एका व्यक्तीने स्वत:च्या जीव धोक्यात टाकून दलदलीत अडकलेल्या मेंढीला वाचवण्याचं धाडसं एका तरुणानं केलं मात्र पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला धक्का बसेल.हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मेंढीला वाचवण्यासाठी या व्यक्तीने स्वतःच्या जीवाची बाजी लावली. ही व्यक्तीही दलदलीत उतरली. दलदलीत एकदा गेलेला व्यक्ती किंवा प्राणी पुन्हा आला असं क्वचितच घडलं असेल. दलदल म्हणजे जवळपास मृत्यू निश्चित मात्र या माणसाने एका मेंढींला वाचवण्यासाठी स्वत: या जीवघेण्या दलदलीत उतरला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या व्यक्तीचे पाय दलदलमध्ये रुतत आहेत. मग तो बसून सरकत सरकत तो मेंढीपर्यंत पोहोचतो. मेंढीला दोन्ही हातांनी खेचून दलदलीत बाहेर काढतो.
लगेच बाहेर येणं कठीण होतं त्यामुळे तो हळू हळू दलदलीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. मात्र अखेर स्वतःसह तो मेंढीलाही दलदलीतून सुखरूप बाहेर काढतो
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – VIDEO: ही तर खाकी वर्दीची गुर्मी! रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या लहानग्याला पोलिसांनी लाथेनं मारलं अन्
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला लोक खूप पसंत करत आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलंय. अनेकांनी तो रिट्विटही केला आहे.