Shocking video: तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी लाखों लोकांचा मृत्यू होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं तंबाखूच्या विळख्यात अडकली आहेत. तंबाखूमुळे हृदय आणि फुफ्फुसाच्या विविध आजारांसोबतच हाडांचीही समस्या होते. तरीही काही लोकांचं व्यसन काही सुटत नाही. अगदी मरणाच्या दारात पोहोचेपर्यंत त्यांचं व्यसन सुरु असतं. सध्या एक विचित्र प्रकार समोर आलाय, त्यामध्ये एक व्यक्ती रुग्णालयात एमआरए करायला जाताना तंबाखू मळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून हा व्हिडीओ बघून तुम्हीही डोक्याला हात माराल.

बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या गोष्टींचं व्यसन असतं. कितीही काही झालं तरी त्यांचं ते व्यसन सुटत नाही. अगदी मरणाच्या दारात पोहोचेपर्यंत त्यांचं व्यसन सुरु असतं. सध्या एक गजब प्रकार समोर आलाय.मावा, गुटखा किंवा पान मसाल्याचं सेवन करणं हे शरीरासाठी हानिकार आहे. बरं, या तंबाखूजन्म पदार्थांमुळे कुठले आजार होतात आणि रुग्णाची अवस्था शेवटी कशी होते याबाबत माहिती देणारे शेकडो व्हिडीओ, ब्लॉग्स, विविध प्रकारचे रिसर्च पेपर्स अगदी खोऱ्यानं तुम्हानं इंटरनेटवर सापडतील. अगदी डॉक्टर्स पासून आई-बाबांपर्यंत सर्व जण तंबाखूचं सेवन न करण्याचा सल्ला देतात. मात्र तरी देखील आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते. अशाच एका तंबाखू प्रेमी रुग्णाचा व्हिडीओ समोर आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीला तंबाखूचं इतकं व्यसन लागलेय की तो अगदी एमआरआय करायला जातानाही तंबाखू मळताना दिसतोय. खरंच हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा डोक्याला हातच लावाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रुग्णालयामध्य एमआरआयच्या खोलीमध्ये एका रुग्णाला झोपवले आहे. यावेळी त्याला एमआरआय करण्यासाठी मशीनमध्ये पाठवण्यात येत आहे मात्र अशातच हा व्यक्ती आधी तंबाखू मळण्यात व्यस्त आहे. रुग्णालयात येऊनही अशाप्रकारे शरिराशी खेळ करताना हा व्यक्ती दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ muddyachbola या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ३ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलंय. ‘जान जाये पर तंबाखू न जाये’ असं म्हणत अनेकांनी या रुग्णाची फिरकी घेतली आहे.

Story img Loader