Viral video: भारतातील अनेक लोक प्रवासासाठी ट्रेनचा वापर करतात. कमी अंतर असो वा लांब, भारतीय रेल्वेचं जाळं सर्वत्र पसरलेलं आहे. रेल्वेनं प्रवास करणं सोयीचं आहे, मात्र थोडासा निष्काळजीपणाही ते तितकंच धोकादायक बनवतो. अनेकदा रेल्वेच्या धडकेनं लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत असतात. यातील बहुतांश अपघात लोकांच्या निष्काळजीपणामुळे होतात. अनेकदा सल्ला देऊनही लोक ट्रेनमध्ये नको ती मस्ती करू लागतात आणि अपघाताला बळी पडतात.

रेल्वेने प्रवास करताना लोकांना अनेकदा अनेक मार्गदर्शक सूचना दिल्या जातात. हे त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी असतं. यामध्ये, चालत्या ट्रेनमध्ये चढण्यास आणि उतरण्यास मनाई आहे, हे लोकांना समजावून सांगितलं जातं. पण भारतातील लोक ऐकतात कुठे? तुम्ही अनेकदा लोकांना धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा आणि उतरण्याचा प्रयत्न करताना पाहिलं असेल. तसंच, दरवजात उभ राहू नका सांगूनही लोक एकत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी ट्रेनच्या गेटवर उभी असलेली दिसत आहे. यादरम्यान तिचा पाय घसरला. यापुढे जे काही घडलं ते पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.

Fifty eight people died in horrific accident at Kanhan railway crossing near Nagpur 20 years ago
२० वर्षांपूर्वीच्या भीषण रेल्वे अपघाताचे स्मरण, काय घडले होते?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
vasai virar increase population news in marathi
शहरबात : वाढत्या लोकसंख्येचे बळी
indian railways viral video argument between tte and passenger
टीटीईने व्हिडीओ काढणाऱ्या प्रवाशाला सांगितला भलताच कायदा; “सात वर्षांचा तुरुंगवास अन्….”, पाहा संतापजनक VIDEO
pune metro
पुणेकरांचा नादखुळा! पुणे मेट्रोतून प्रवास करताना तरुणांनी केले असे काही, Viral Video पाहून पोटधरून हसाल
Four people died in different accidents in Pune city
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू
western railway year 2024 vasai palghar dahanu railway line 227 passengers death
वसई, नालासोपारा रेल्वे स्थानकांतील गर्दी प्रवाशांच्या जीवावर; ट्रेन मधून पडून ५० तर रुळ ओलांडताना १२८ प्रवाशांचा मृत्यू
Mumbai Chembur Metro accident
मुंबई : चेंबूरमध्ये मेट्रोचं अर्थवट बांधकाम रहिवासी सोसायटीच्या आवारात कोसळलं

ट्रेनने प्रवास करताना स्टेशन जवळ आलं की आपण ट्रेनच्या दरवाजात जाऊन उभं राहतो. तसं हे आपल्यासाठी सामान्य पण हीच सवय भयंकर ठरू शकते. ट्रेन ने प्रवास करताना रेल्वे स्टेशन येण्याआधी दरवाजात उभं राहणं किती भयानक ठरू शकतं, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगी ट्रेनच्या दरवाजाजवळ उभी असताना जलद लोकल येते आणि तेवढ्यात तिचा पाय घसरतो आणि ती खाली सरकते. मात्र याचवेळी तिथे असलेले प्रवासी तिला पकडतात आणि वर खेचतात. नशीब बलवत्तर म्हणून तरुणीचे प्राण वाचले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> तुम्हीही ऑनलाईन पार्सल मागवता का? डिलिव्हरी एजंटचं कृत्य पाहून बसेल धक्का, VIDEO पाहाच

चालत्या ट्रेनच्या दारात घडलेली अशी घटना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी अशी चूक पुन्हा करणार नाही अशी शपथ घेतली. दरम्यान हा व्हिडीओ @FAFO_TV या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर लोक संतापजनक प्रतिक्रिया देत मुलीला दोष देत आहेत. तर तिला वाचवणाऱ्यांचं कौतुक करत आहेत.

Story img Loader