Man Saves Mother And Baby Childs Life : मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी थैमान घातले असून नद्यांना पूर आला आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे लोकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. पण काही लोक पुराच्या पाण्यातूनही प्रवास करून स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. रस्त्यावर सुरु असलेल्या पाण्याच प्रवाहात काही लोक वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशाच प्रकारचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक माता तिच्या लेकराला सोबत घेऊन पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडत असल्याचं थरारक दृष्य कॅमेरात कैद झालं आहे. या महिलेच्या बेजबाबदारपणामुळे तिच्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. परंतु, त्यानंतर जे काही घडलं ते पाहून तुमच्याही अंगाला काटा आल्याशिवाय राहणार नाही.
माय-लेक अडकले पुराच्या पाण्यात अन्…
मुसळधार पावसात आणि पूर आल्यावर सतर्क राहण्याच्या सूचना नागरिकांना दिल्या जातात. परंतु, काही लोक हे नियम मोडतात आणि जीव गमावून बसतात. या व्हिडीओत पाहू शकता की, एक महिला स्ट्रोलरमध्ये असलेल्या मुलासह रस्त्यावर वाहणाऱ्या वेगवान प्रवाहातून जाण्याच प्रयत्न करत असते. यानंतर ती महिला पाण्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते, परंतु दोघेही पाण्यातच अडकतात. त्याचदरम्यान तिचा मुलगा पाण्यात पडतो.
इथे पाहा व्हिडीओ
ही थरारक घटना पाहिल्यानंतर एक व्यक्ती त्या महिलेच्या मदतीला धावतो आणि मुलाला पाण्यातून बाहेर काढतो. स्ट्रोलर पलटी झाल्याने मुलगा पाण्यात पडून वाहून गेला असता. पण त्याचक्षणी एक मुलगा देवदूत बनून आला आणि त्यांचे प्राण वाचवले. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एकाने प्रतिक्रिया देत विचारलं की, ती महिला शेवटी पळून का जाते? तर दुसरा नेटकरी म्हणाला, मुलाचं प्राण वाचवणाऱ्या व्यक्तीचं आभार मानावे तितके कमी.