viral video: आजकाल अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. दिवसाढवळ्या महिलांवर अत्याचार होतात. गुन्हेगारीच्या अनेक अशा घटना समोर येतात, ज्या संपूर्ण देशाला हादरवून सोडतात. श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर अशा प्रकारची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. दिल्लीत तर मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न पडतो. अशीच एक संतापजनक घटना समोर येतेय. सोशल मीडियावर एका महिलेला भर रस्त्यात मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं काय घडलं –

दिल्लीच्या मंगोलपुरी फ्लायओव्हरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवून मारहाण करताना दिसत आहे. त्या व्यक्तीने महिलेला कारच्या आत ढकलल्यानंतर तिला मारहाण केली आणि नंतर समोरच्या सीटवर बसला तर काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दुसरा पुरुष कारमध्ये येऊन महिलेच्या शेजारी बसला. हा व्हिडीओ विष्णू जोशी नावाच्या एका व्यक्तीने शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ –

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्रामच्या रतन विहारमध्ये राहणार्‍या दीपकच्या नावावर ही कार नोंदणीकृत आहे आणि दीपकने ती एका फायनान्सरला विकली होती. आतापर्यंत हे वाहन सुमारे ५०० जणांना विकले गेले आहे. दरम्यान हा व्हिडीओ पाहून नेटकरीही चांगलेत संतापले असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी होत आहे.