तुम्ही अनेकदा हे वाक्य ऐकलं असेल की, बोलणाऱ्याची मातीसुद्धा विकली जाते आणि न बोलणाऱ्याचे सोनेही विकलं जात नाही. कारण चांगल्याप्रकारे बोलणाराच माणूस आपली कोणतीही वस्तू ग्राहकांना सहज विकू शकतो. यामुळे कोणताही व्यवसाय करताना तुमच्याकडे बोलण्याचे स्कील असले पाहिजे. आपण पाहतो रस्त्यावर उन्हात उभं राहून अनेक विक्रेते फळं, भाज्या विकत असतात. पण, यात जोरजोरात ओरडत ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या विक्रेत्यांकडे गर्दी फार असते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो अगदी अनोख्या पद्धतीने ग्राहकांना आपली वस्तू विकत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोक त्याची खिल्ली उडवत आहेत, तर काही लोक त्याच्या मेहनतीला सलाम करत आहेत.

विक्रेत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता, एक व्यक्ती हातात स्पीकर घेऊन उभी आहे. यावेळी त्याच्या हातात काही वस्तूही दिसत आहेत. याच वस्तू विकण्यासाठी या व्यक्तीने वापरलेली पद्धत पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. व्हिडीओमध्ये तो विक्रेता स्पीकरवर म्हणतोय की, कोमलच्या आईला डासांपासून वाचवा, पण कोमलचे वडील म्हणाले की, मी तिला वाचवणार नाही, त्याऐवजी मी बुद्ध मार्केटमध्ये जाईन पनीर भटुरे खाईन, मी तिथून सामान आणून देईन, पण कोमलच्या आईला डासांपासून वाचवणार नाही. हा विक्रेता डासांपासून वाचवण्यासाठी कोणती वस्तू विकत हे बोलताना दिसतोय, पण त्याची ही वस्तू विकण्याची अनोखी पद्धत युजर्सना फार आवडली आहे.

हेही वाचा – ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्याची कोकणामध्ये भजनातही क्रेझ; बुवांच्या भजनाचा Video व्हायरल

हा मजेशीर व्हिडीओ @curious_clip या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो एक लाख ७४ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे; तर काहींनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलेय की, थांबा, कोमलचे वडील येत आहेत; तर अनेकांनी त्याच्या मेहनतीचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले की, हा माणूस खूप मेहनत करतोय, त्याला सलाम…

Story img Loader