Ayodhya Old Man Food Serving Video: प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्या अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या या रामनगरीतील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही किळस वाटेल. एखादी व्यक्ती समाजकार्य करताना इतकी घाण कशी वागू शकते, असा प्रश्न तुम्हाला पडेल. या व्हिडीओत एक व्यक्ती अनेकांना मोफत अन्न वाटप करताना दिसतेय. पण, तिचा अन्न वाटप करतानाचा अवतार पाहून तुम्हाला किळस वाटेल.
आपल्या देशातील अनेक प्रांतात अनोळखी लोकांना आदरपूर्वक मोफत जेवण वाटण्याची प्रथा आहे. अनेक जण सण-समारंभ किंवा काही खास दिवसानिमित्त रस्त्यावरील गरीब गरजू लोकांना मोफत जेवण वाटप करतात. यात अनेक मंदिर परिसरातही लोकांना मोफत जेवण दिले जाते. अशाचप्रकारे अयोध्या मंदिर परिसरातही गरजूंना जेवण वाटप केले जात होते. एक वृद्ध व्यक्ती घामेजलेल्या अंगाने चक्क जेवणाच्या टोपावर पाय ठेवून जेवण वाटप करत होती. ज्या टोपातून जेवण वाटत होती, त्याच भाताने भरलेल्या टोपावर ती घाणेरडे पाय ठेवून उभी होती.
अयोध्येतील व्हायरल व्हिडीओ
युजर्स झाले आश्चर्यचकित
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. दरम्यान, @vilas1818 नावाच्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर नेटिझन्सनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतेक लोकांना जेवण वाढण्याची ही पद्धत अजिबात आवडलेली नाही.
हेही वाचा – राम मंदिराच्या उभारणीमुळे अयोध्येत भीषण महापूर? रामपथावरील रस्ते, महामार्ग पाण्याखाली; पण व्हायरल Video मागचे सत्य काय? वाचा
एका युजरने लिहिले आहे की, सर, हे व्हायरल करण्यापेक्षा त्याचा फोन नंबर घेऊन त्याला प्रेमाने ओरडणे चांगले. दुसऱ्याने लिहिले आहे की, हे पाहणे किळसवाणे आहे. तिसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे की, हे अजिबात योग्य नाही. चौथ्या व्यक्तीने लिहिले आहे की, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोक ते खात आहेत. पाचव्या व्यक्तीने लिहिले आहे – हे खूप चुकीचे आहे.