बेरोजगारी ही जगातील मोठी समस्या बनत आहे. जीवन जगण्यासाठी जशी पैशांची गरज असते तशी पैसे कमावण्यासाठी एका चांगल्या नोकरीची गरज असते. मात्र अनेकजण आज शिकूनही चांगल्या नोकरीसाठी संघर्ष करत आहे. लोक आपल्या शिक्षणानुसार कोणतेही काम करायला तयार असतात, पण त्यांना कामच मिळत नाही. यात जगात आधीच नोकऱ्यांची कमतरता होती, त्यात वर कोरोना आला आणि नोकऱ्यांचा तुटवडा आणखी वाढला. मात्र आता हळूहळू अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत.

पण सध्याच्या घडीला नोकरीची असलेली कमतरता दाखवणारे एका व्यक्तीचे जॉब अॅप्लिकेशन सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. या व्यक्तीने आपल्या सीव्हीबरोबर नोकरीसाठी लिहिलेले लेटर वाचून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. हे लेटर वाचून खुद्द एचआरही वेडा झाला असेल. कारण हे लेटर अशापद्धतीने लिहिले आहे जे वाचल्यानंतर अनेकांना हसू आवरणे अवघड होत आहे. सध्या या जॉब अॅप्लिकेशनचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्ही देखील हे अॅप्लिकेशन वाचाल तर हसल्याशिवाय राहणार नाही.

Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Uber driver gets review as a good kisser from customer post viral on social Media
“चांगला किस करणारा”, ड्रायव्हरचा असा रिव्ह्यू तुम्ही कधीच ऐकला नसेल, ‘या’ व्हायरल पोस्टमध्ये नेमकं आहे तरी काय
Mother strangled her child shocking video viral on social media
आई की वैरीण? चिमुकल्या मुलाला जमिनीवर झोपवलं, गळा आवळला अन्… VIDEO पाहून होईल काळजाचं पाणी पाणी
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
viral video
VIDEO : असे विद्यार्थी मराठी शाळेतच घडू शकतात! संगणकालाही टक्कर देतात हे विद्यार्थी, अनोखी कला एकदा पाहाच

व्हायरल होणारे जॉब अॅप्लिकेशन लेटर हे टेक्निकल मॅनेजर या पदासाठी आहे, त्या व्यक्तीने त्यात लिहिले आहे की, त्याला माहित आहे की, त्याच्या कंपनीच्या मॅनेजरचा मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत ही पोस्ट आता रिक्त आहे. या कारणास्तव तो रिप्लेसमेंटसाठी अॅप्लिकेशन पाठवत आहे. त्याने पुढे लिहिले की, जेव्हा जेव्हा तो नोकरीसाठी विचारतो तेव्हा कंपनी म्हणते की, सध्या कोणतेही पद रिक्त नाही. मात्र यावेळी त्याने टेक्निकल मॅनेजरचे पद रिक्त असल्याचे कळले. ही गोष्ट कन्फर्म करण्यासाठी त्याने एक्स मॅनेजरच्या अंत्यसंस्कारालाही हजेरी लावली होती.

इतकेच नाही तर यानंतर या व्यक्तीने अर्ज पाठवतानाही जरा वेगळ्या पद्धतीने पाठवला, म्हणजे की, त्याने आपल्या सीव्हीबरोबर मृत एक्स मॅनेजरचे डेथ सर्टिफिकेटही जोडले होते. नोकरीसाठी व्यक्तीची ही केविलवाणी धडपड पाहून अनेकांना हसू आवरणे अवघड झाले आहे. अनेकांनी कमेंट करत फार मज्जा घेतली आहे. एका व्यक्तीने लिहिले की, कदाचित याच्यापेक्षा जास्त नोकरीची गरज कोणाला असेल असे वाटत नाही. तर अनेकांनी त्याची हतबलता पाहून कमेंटमध्ये एचआरला त्याला नोकरी देण्याची रिक्वेस्ट केली आहे.

Story img Loader