‘आब्रा का डब्रा… गिली गिली छू’ असा आवाज करत डोळ्याचे पाते लवते न लवते तोच कधी साध्या कागदातून रंगीबेरंगी फुलांचा गुच्छ; तर कधी साखळदंडाप्रमाणे कडक झालेली हवेत सरळ रेषत अधांतरी तरंगणारी दोरी अशी जादू तुम्ही लहानपणी अनेकदा पाहिली असेल. जादूचे खेळ पहायला प्रत्येकाला आवडते, मग ते छोटे मंडळी असो किंवा मग ज्येष्ठ मंडळी. प्रत्येकजण मोठ्या उत्सुकतेने हे जादूचे खेळ पाहत असतात. फक्त माणूसच नव्हे तर प्राणी सुद्धा असे जादूचे खेळ पाहून अचंबित होत असतात. असाच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये एक माणूस प्राणीसंग्रहायलयात असलेल्या एका माकडाला जादू दाखवायला निघाला. पण पुढे जे घडतं ते पाहून तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस प्राणीसंग्रहालयातील माकडाला जादूच्या खेळ दाखवताना दिसत आहे. हा माणूस नक्की काय करतोय हे पाहण्यासाठी माकड सुद्धा त्या व्यक्तीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत असतो. हा माणूस जो जादूचा खेळ माकडाला दाखवतो, हे या व्हिडीओचं आकर्षण नव्हे. तर जादूचा खेळ पाहणारे माकड या व्हायरल व्हिडीओचं खरं आकर्षण ठरले आहे. ज्यावेळी माणूस या माकडाला जादू दाखवतो, त्यावेळी पूर्ण लक्ष देऊन हे माकड जादू पाहत असतो. जेव्हा माणसाची जादू दाखवून संपते त्यावेळी माकड थोडा वेळ विचार करतं आणि मग तो अगदी आश्चर्यचकित झाल्यासारखे क्यूट एक्सप्रेशन्स देतो. या व्हिडीओमध्ये माकडाने ज्या प्रकारचे एक्सप्रेशन्स दिले आहेत, ते पाहून तुम्हालाही हसू येईल. हे पाहून प्रत्येकाचे डोळे विस्फारून जातील.

आणखी वाचा : TMC च्या Mahua Moitra आणि त्यांची ‘Luis Vitton Bag’ ट्विटरवर करतेय ट्रेंड, वाचा मजेदार ट्विट

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अपयशाने खचून गेलात? मग सफाई कामगार ते SBI अधिकारी बनलेल्या या महिलेची प्रेरणादायी कहाणी जरूर वाचा!

हा व्हायरल व्हिडीओ पुबितीच्या इन्स्टाग्राम हँडलवरून शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. या व्हिडीओमधल्या माकडाने त्याच्या एक्सप्रेशन्सने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. हा व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह मात्र लोकांना आवरता येत नाहीय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १२ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ९ लाखपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडीओ पाहून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man shows magic trick to a monkey at zoo viral video shows its rofl reaction prp