सिगारेट ओढणे (धूम्रपान) आरोग्यासाठी हानिकारक आहे, प्रत्येक सिगारेट आणि विडीच्या बॉक्सवरही तुम्हाला अशा इशाऱ्याचा मेसेज लिहिलेला दिसेल, पण तरीही जगात अनेक लोक आहेत, ज्यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन जडले आहे. काही जणांना धूम्रपानाचे इतके व्यसन जडलेले असते की, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ते त्याशिवाय राहू शकत नाही. सिगारेटचा धूर मानवी शरीरावर आतून परिणाम करत असतो हे अनेकांना माहीत असलेच, पण सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात सिगारेटबाबत एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे.
सध्या सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. या ट्रेंडमध्ये लोक अनेक गोष्टी मायक्रोस्कोपखाली ठेवून पाहत आहेत. यावेळी बाजारात मिळणाऱ्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळून आले. यात आता एका व्यक्तीने सिगारेट तोडून त्यातील तंबाखू मायक्रोस्कोपखाली ठेवला. यावेळी असे काही दृश्य दिसले, जे फार धक्कादायक होते.
सिगारेट ओढणाऱ्या अनेकांना वाटते की, सिगारेटमध्ये फक्त तंबाखू असतो व ते ओढणाऱ्यांना हेही माहीत असते की, ते आरोग्यासाठी घातक असते. मात्र, तरीही काहीजण सिगारेटच्या व्यसनाचे बळी ठरतात. पण, व्हायरल होणारा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही पुन्हा बिडी किंवा सिगारेट ओढण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल. मायक्रोस्कोपच्या खाली सिगारेटमधील तंबाखू ठेवून निरीक्षण करताच त्यात काही किडे रेंगाळताना दिसले.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती सिगारेटच्या आत असलेली तंबाखू चिमट्याच्या साहाय्याने बाहेर काढतो. यानंतर त्यातील काही तंबाखू तो मायक्रोस्कोपच्या खाली ठेवून त्याचे बारकाईने निरीक्षण करतो, तेव्हा त्याला त्यात बारीक किडे आढळून येतात. हे किडे सिगारेटच्या आत फिरत असतात.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हा अतिशय किळसवाणा प्रकार असल्याचे म्हटले आहे… तर काहींनी ही सिगारेट कालबाह्य झालेली असेल असे म्हटले आहे. बर्याच जणांनी सिगारेट लाइट केल्यानंतर हे किडे मरतात, अशाने नुकसान काय होणार आहे? असा सवाल केला आहे.