Singing In Mumbai Local Video:मुंबई लोकलमध्ये मज्जा मस्ती करणे वाटते तितके सोपे नाही. कचाकच भरलेल्या लोकांच्या गर्दीमध्ये मोठ्या प्रयत्नांनी हव्या त्या ठिकाणी लोक पोहचतात. कोणाला बसायला जागा मिळत नाही तर कोणी उभ्या उभ्या कित्येक तास प्रवास करतात. जरा विचार करा तुमचा हा त्रासदायक प्रवास कोणीतरी मजेशीर बनवला तर? नक्कीच मजेशीर वातावरणामुळे तुमचा प्रवासाचा थकवा गायब होईल आणि तुमचा दिवस सार्थकी लागेल. सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये लोकलमध्ये प्रवास करणारे प्रवासी लोकल प्रवासाचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने आनंद घेताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकल प्रवासात प्रवाशांनी केली मजामस्ती

जेव्हा स्मार्ट फोन नव्हते तेव्हा बस किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना लोक खूप गप्पा मारायचे. अशावेळी करमणूक व्हायची आणि या कारणामुळे अनेकवेळा त्यांची मैत्री व्हायची. पण आता हे दृश्य हे क्वचितच पाहायला मिळते. सध्या प्रवासातील मैत्री दर्शविणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती गाणे गाताना दिसत आहे. तर काही प्रवासी या गाण्यावर नाचताना दिसतात. हे प्रसन्न वातावरण पाहून लोकांना आनंद होत आहे.

हेही वाचा – आईस्क्रीम तयार करण्याचा विचित्र जुगाड; गाडीच्या टायरला बांधला डब्बा अन्….. पाहा Viral Video

ही क्लिप इंस्टाग्रामवर कल्पेश राणे (@1998_roadrunner) नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे- ”मला या पिढीतील लोक आवडतात.” व्हिडिओमध्ये ट्रेनमध्ये उभे असलेले काका ‘कांटा लगा’ गाणे गाताना दिसत आहेत. जसे ते गाणे गायला सुरुवात करतात तसे एक वयस्क व्यक्ती त्यांच्या शेजारी मस्त मजेत नाचू लागतो. अन् पाहता पाहता मजेशीर वातावरण तयार होते. सर्व प्रवाशांची मजा मस्ती बघून तुम्ही म्हणाल की, ”उम्र है पचपन का और दिल है बचपन है”

हेही वाचा – Optical illusion : फोटोतील व्यक्ती नेमकी कुठे बसली आहे, घराच्या आत की बाहेर? जरा डोकं वापरा अन् सांगा!

इथे प्रत्येक क्षण भरभरून जगा…
२३ जून रोजी पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओला आतापर्यंत १ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर यूजर्स त्यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही देत ​आहेत. एकाने लिहले ”सगळ्यांचा पगार एकत्र आला आहे” असे दिसते. दुसरा म्हणाला, ”यालाच म्हणतात जीवनाची खरी मजा” तिसर्‍याने लिहिले,”त्या वेळी मी देखील ट्रेनमध्ये असायला हवा होतो, बरं, कोणी काहीही म्हणो, पण आयुष्य मोकळेपणाने जगायला हवं हेच खरं. कारण चढ-उतार हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग असतो. पण जे प्रत्येक परिस्थितीत आनंदी असतात तेच पूर्ण जगू शकतात.”

तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला?

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man sings kanta laga in mumbai as passengers dance local video goes viral snk