म्युझिक बँड वाजवणाऱ्या कलाकारांना पाहण्याची एक वेगळी मज्जा असते. कारण यातील गिटारिस्ट, ड्रमर ते वेगवेगळे म्युझिक इंस्ट्रूमेंट वाजवणारे कलाकार आपल्या स्टाईलने इंस्ट्रूमेंट वाजवत लोकांचे मनोरंजन करत असतात. खास करून गिटारिस्ट आणि ड्रमरचे वादन पाहण्यात लोकांना फार इंट्रेस्ट असतो. याचवेळी काही लोक पियानो वाजवणाऱ्या कलाकाराच्या ट्यूनवरही गुणगुणायला लागतात. एकूणच रॉक बँडचे हे सादरीकरण पाहण्याचा एक अतिशय मजेदार अनुभव असतो, पण एकच कलाकार ड्रम, गिटार वाजवत आपल्या मधुर आवाजात गाणंही गातोय असे तुम्ही कधी पाहिले आहे का? नाही ना. पण आता सोशल मीडियावर अशा एका कलाकाराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तो एकटाच एकाचवेळी ड्रम सेट आणि गिटार वाजवून लोकांचे मनोरंजन तर करतोयच, इतकच नाही तर याला सुमधुर संगीताची जोड देत तो लोकांचा आनंद द्विगुणित करतोय. त्यामुळे युजर्स या व्यक्तीची कला पाहून तोच खरा रॉकस्टार असल्याचे म्हणत आहेत.
व्हिडीओतील मल्टी टॅलेंटेड व्यक्तीचे कला गुण पाहून अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती संपूर्ण ड्रम सेट आणि गिटार एकाचवेळी अगदी तालात वाजवतोय. पण, हे किती अवघड काम आहे याची कल्पना ज्यांना म्युझिकमधलं समजत ते करू शकतात. कारण प्रत्येक इंस्ट्रूमेंट शिकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, यासाठी अनेक महिन्यांचा सराव करावा लागतो. त्यामुळे या व्यक्तीच्या टॅलेंटला दाद देऊ तेवढी कमी आहे. या व्यक्तीने पाठीवर एक जड ड्रम सेट बसवला असून, जो तो पायाच्या मदतीने वाजवत आहे. इतकंच नाही तर गिटार वाजवत तो गाणंही म्हणत आहे. एकाच वेळी इतके इंस्ट्रूमेंट वाजवणे कोणालाही सहज शक्य होणार नाही, पण या व्यक्तीने ते चांगल्याप्रकारे जमवून आणलं आहे.
कलाकाराचा व्हायरल व्हिडीओ
हा व्हिडीओ स्किल्स (@finetraitt) नावाच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, फुल्ल लोडेड म्युझिशियन. या व्हिडीओला आत्तापर्यंत १२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक युजर्स या व्यक्तीने केलेला जुगाड आणि त्याचे कौशल्य पाहून खूप प्रभावित झाले आहेत. युजर्सनी त्या व्यक्तीच्या टॅलेंटवर कमेंट करत लिहिले की- क्या बात है, याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. यावर एक युजर म्हणाला की, भाऊ, हे पॅकेज आहे. त्याचवेळी दुसर्या युजरने लिहिले की, असे टॅलेंट प्रत्येकाकडे असले पाहिजे. पण, तुम्हाला या व्यक्तीचे टॅलेंट कसे वाटले आम्हाला कमेंट करून सांगा.