अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्या घराच्या टॉयलेटमध्ये बसला आहात आणि अचानक तुमची नजर टॉयलेटच्या छतावर पडते आणि तुम्हाला शॉवरवर एक भला मोठा अजगर बसलेला दिसतो. कल्पना करुनही थरकाप उडवाणारा हा प्रसंग प्रत्यक्षात एका व्यक्तीसोबत घडली आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत असेच काहीसे घडले आहे, तो टॉयलेटमध्ये बसल्यानंतर त्याच्या शॉवरच्या वर एक मोठा कार्पेट अजगर त्यांने पाहिला आणि त्याला धक्काच बसला. रॅटलस्नेक शॉवर स्क्रीनवर आरामात बसलेला होता पण हा व्यक्तीचा मात्र भितीने थरकाप उडाला होता . घाबरलेल्या व्यक्तीने हडसन स्नेक कॅचिंग येथून स्थानिक सर्पमित्रांना बोलावावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टॉयलेटमध्ये सापडला भलामोठा अजगर

हडसन स्नेक कॅचिंगने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले, “बाथरूममध्ये गेलेल्या एका क्लायंटला कार्पेट पायथना पाहून धक्का बसला. या सापाला ऑक्सनफोर्डमधील घरातून स्थलांतरित केल्याबद्दल अँथनी जॅक्सनचे आभार. पोस्टसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये ६ फुटांचा अजगर काचेच्या शॉवर स्क्रिवर आरामात आपेल शरीर गुंडाळून बसलेला दिसत आहे.

हेही वाचा – व्हिलचेअर मिळेना म्हणून संतापलेला व्यक्ती स्कुटी घेऊन थेट हॉस्पिटलमध्येच शिरला! पुढे काय घडलं ते जाणून घ्या

फक्त ३० सेकंदात अजगराला आणले खाली

हडसन स्नेक कॅचिंगच्या अँथनी जॅक्सन कॉल केल्यानंतर अवघ्या नऊ मिनिटांत घटनास्थळी पोहोचला आणि त्याला अजगराला शॉवरमधून खाली आणण्यासाठी फक्त ३० सेकंद लागले.

जॅक्सनने News.com.au ला सांगितले. “मी काही मिनिटे हसणे थांबवल्यानंतर, मी हुक घेतला आणि त्याला खाली घेतले आणि ते थोडे कठीण होते … कारण मी त्याला हिट लँपपासून दूर केले होते जेथे त्याला आरामदायी वाटत होते.”

हेही वाचा – महाराष्ट्राच्या लेकीचा विश्वविक्रम! सलग १२७ तास नृत्य करून गिनिज बूकमध्ये केली नोंद

चावण्याचा प्रयत्न करत होता अजगर

तो म्हणाला, “त्याने मला चावण्याचा प्रयत्न केला. मला वाटते की तो शिकारी होता कारण त्याने खाली पाहिले आणि मला अन्न असल्यासारखे पाहात होता.

जॅक्सन म्हणाला त्यांचा आकार मोठा असूनही अजगर जिज्ञासू असतात, परंतु एकटे सोडल्यास बहुतेक निरुपद्रवी साप असतात. कार्पेट अजगर बिनविषारी असतात आणि कोणत्याही प्रकारे त्रास दिल्यावर किंवा चिथावणी दिल्यावरच ते चावतात. ते १३ फूट लांबीपर्यंत वाढू शकतात आणि तस्मानिया वगळता ऑस्ट्रेलियामध्ये सर्वत्र ते आढळू शकतात.

वर्षाभरात याकाळात, ऑस्ट्रेलियातील साप हिवाळ्याच्या महिन्यांत विश्रांतीसाठी सुरक्षित ठिकाणे शोधत असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man sitting on toilet spots tremor after seeinh a massive python resting atop shower screen in australia snk
Show comments