हावडा ते रांचीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये वेटर आणि प्रवासी यांच्यात झालेल्या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. एका वेटरने चुकून शाकाहारी प्रवाशाला मांसाहार दिल्याने गोंधळाचे दृश्य समोर आले. वृद्ध प्रवाशाने पॅकेज केलेल्या जेवणावर “मांसाहारी” चिन्ह पाहिले नाही आणि ते अन्न खाल्ले. आपण जे खाल्ले ते शाकाहारी नसल्याचे लक्षात येताच संतापलेल्या प्रवाशाने वेटरला दोनदा चापट मारली. २६ जुलै रोजी ही घटना घडली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इतर प्रवासी वृद्ध प्रवाशाशी सामना करताना आणि त्याला वेटरची माफी मागायला सांगतात. “कहां लिखा हुआ है? (त्याचा उल्लेख कुठे आहे?),” असे तो माणूस म्हणत आहे. कदाचित “मांसाहारी” चिन्हाबद्दल बोलत असावा.. “क्यूं मारा इसको? इतना उमर हो गया! (तुम्ही त्याला का माराल? तुमचे वय बघा!),” असे एक सहप्रवासी म्हणतो. दरम्यान, वेटर माफी मागताना दिसतो.

दुसऱ्या व्हिडिओमध्ये, इतर प्रवासी वृद्ध व्यक्तीला पोलिसांसमोर वेटरची माफी मागायला सांगत आहेत. व्हिडीओ शेअर करताना कपिल या एक्स वापरकर्त्याने लिहिले की, “एका व्यक्तीने वेटरला चुकून मांसाहार दिल्याबद्दल कानाशिलात लगावली. इतर लोक वेटरला पाठिंबा देण्यासाठी आले.

हेही वाचा – “मित्रा, जीव वाचव, परत ये”,पुराच्या पाण्यात गाडी घेऊन गेला तरुण, मित्र ओरडत राहिला पण त्याने ऐकले नाही, पाहा Viral Video

व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, एका वापरकर्त्याने लिहिले की, “नागरिकांना योग्य गोष्टींसाठी उभे असलेले पाहणे दुर्मिळ आहे.” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेट केली, “नेतागिरी आणि गुंडागर्दीच्या विरोधात लोकांचा विरोध पाहून आनंद झाला. समाज हे सत्तेच्या भांडणाचे मैदान बनू नये.”

“सहप्रवासी वेटरला पाठिंबा देईल अशी अपेक्षा नव्हती,” असे तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.

हेही वाचा – वादकांच्या काळजाचं पाणी करणारा Video Viral; पुराच्या पाण्यात वाहून गेले ढोल

जानेवारीमध्ये, वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये सामान ठेवण्यासाठी दोन प्रवाशांमध्ये भांडण झाल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला होता. व्हायरल व्हिडिओमध्ये दोन पुरुष एकमेकांवर ओरडताना दिसत आहेत, त्यानंतर एक रेल्वे अधिकारी त्यांना शांत करण्यासाठी आत येतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man slaps vande bharat express staff for serving non vegetarian food by mistake passengers support waiter say sorry snk