आज काल फॅशनच्या नावाखाली अतरंगी कपडे परिधान करुन लोक सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट करतात. तुम्ही अतरंगी फॅशनचे असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. फॅशन इंडस्ट्री आता काळानुसार बदलत आहे. आजच्या काळातील फॅशनची व्याख्या आता पुर्णपणे बदलली आहे. सध्या फॅशनच्या जगात कपड्यांच्याबाबतीत स्त्री-पुरुष अशा कोणत्याही मर्यादा राहिलेल्या नाही. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या तुफान चर्चेत आहे.
तुम्ही आतापर्यंत नेहमी फक्त मुलींनाच स्कर्टमध्ये परिधान करताना पाहिले असेल पण तुम्ही कधी एखाद्या पुरुषाला फॅन्सी स्कर्टमध्ये पाहिले आहे का? नसेल हा व्हिडिओ नक्की पाहा. सोशल मिडियावर हा व्हिडिओ प्रंचड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चक्क एक तरुण स्कर्ट घालून लोकलमध्ये फिरताना दिसत आहे. हे सर्व पाहून प्रवासी देखील गोंधळात पडलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ मुंबईच्या लोकल ट्रेनमधील आहे. व्हिडिओला 6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळत आहेत आणि अनेक संमिश्र प्रतिक्रिया देखील मिळाल्या आहे.
कोण आहे हा ‘द गाय इन अ स्कर्ट’
व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती शिवम भारद्वाज आहे. शिवम एक फॅशन ब्लॉगर आहे, जो त्याच्या इन्स्टाग्रामवर फॅशनशी संबंधित व्हिडिओ शेअर करत असतो. तो उत्कृष्ट मेकअप व्हिडिओ शेअर करतो. शिवमचे सोशल मीडियावर ‘द गाय इन अ स्कर्ट’ नावाने अकाउंट आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिवम चालत्या ट्रेनमध्ये स्कर्ट घालून कॅटवॉक करताना दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचा स्कर्ट आणि काळ्या रंगाचा सनग्लासेस घातला आहे. मुलींसारखे लांब केस त्याने मोकळे सोडले आहेत आणि मुलींप्रमाणे मेकअप देखील केला आहे. ट्रेनमध्ये बसलेले प्रवासी आ वासून शिवमकडे कॅटवॉक करताना आश्चर्याने पाहात आहे. काही लोक हे दृश्य त्यांच्या फोनमध्येही शुट करत आहेत.
जबरदस्त! ChatGPT ला विचारला प्रश्न अन् तरुणाचं नशीबच पालटलं; झाला लखपती, कसं ते जाणून घ्या
अतरंगी फॅशनसाठी शिवमवर होतेय टीका
याआधीही शिवम अनेकवेळा मुलींच्या कपड्यांमध्ये दिसला आहे. या फॅशन स्टाइलमुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले आहे. सोशल मीडियावर युजर्स शिवमबद्दल सर्व प्रकारच्या गोष्टी बोलत आहे. पण लोकांच्या टोमण्यांची पर्वा न करता शिवमने फॅशन इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे.लोक आता त्यांचे हे काम स्विकारत देखील आहेत. सोशल मीडियावर काही लोक त्याचा हा ड्रेसिंग सेन्स आणि आत्मविश्वासाबद्दल कौतुक करणे थांबवू शकले नाहीत. पण, या प्रतिभावान फॅशन ब्लॉगरसाठी जीवन नेहमीच न्याय्य नव्हते. स्त्रियांच्या कपड्यांकडे त्याचा कल पाहून त्याला घरातून हाकलून दिले. मुंबईत पाय रोवण्यासाठी खूप संघर्ष केल्यानंतर, शिवमने स्वप्नांच्या शहरामध्ये आपली ओळख निर्माण केली.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ?