Anaconda Snake Video : आतापर्यंत तुम्ही घरात कुत्रा, मांजर, ससा, उंदीर असे प्राणी पाळल्याचे पाहिले असेल; पण कधी भल्यामोठ्या अजगराला घरात पाळताना कोणाला पाहिले आहे का? तुम्हाला हे वाचताना थोडं विचित्र वाटेल; पण असे अनेक प्राणीप्रेमी लोक आहेत, जे साप, अजगर असे भयावह प्राणी घरात पाळताना दिसतात. त्यांना अगदी लहान मुलाप्रमाणे अंगाखांद्यावर खेळवतात, जे पाहताना आपल्यालाही भीती वाटते. आता असा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती चक्क महाकाय ॲनाकोंडा सापाला आपल्या बिछान्यावर घेऊन झोपली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे दृश्य पाहताना खूप भीती वाटते; पण व्हिडीओतील व्यक्ती मात्र आरामात ॲनाकोंडा सापाच्या तोंडाजवळ डोके ठेवत पुस्तक वाचत बसलीय. व्हिडीओतील व्यक्ती अमेरिकेतील रहिवासी असून, तिचे नाव माइक होल्स्टन, असे आहे.

सापाच्या तोंडाजवळ डोकं टेकवून झोपला अन्… (Anaconda Snake Viral Video)

माईक हा सर्पप्रेमी आहे. जो रोज साप, सापाबरोबरचे अनेक भयानक व्हिडीओ पोस्ट करीत असतो. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माईक त्याच्या बिछान्यावर एका महाकाय ॲनाकोंडा सापाबरोबर झोपल्याचे दिसत आहे. यावेळी त्याचा कुत्राही बिछान्यावर त्याच्या पायाजवळ आरामात झोपला आहे. माईक अगदी अजगराच्या तोंडाजवळ डोके ठेवून झोपून मस्तपैकी बुक वाचतोय. माईक सापाला पुस्तकातील फोटो दाखवताना दिसत आहे. त्यानंतर तो उठतो आणि त्याच्या कुत्र्याला पुस्तकातील चित्र दाखवतोय. कोणत्याही भीतीदायक वातावरणाशिवाय तिघेही बिछान्यावर अगदी आरामात झोपले आहेत.

माईकने याआधीही महाकाय ॲनाकोंडा सापाबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये तो ॲनाकोंडा सापाला एका कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे ट्रीटमेंट देताना दिसत होता. सापाला खांद्यावर घेऊन, तो अंघोळ करताना दिसला.

फुटपाथवरुन चालत होती, तितक्यात जमिनीखालून झाला भीषण स्फोट अन्…; पाहा अंगावर काटा आणणारा LIVE VIDEO

माईकने हे सर्व व्हिडीओ त्याच्या @therealtarzann इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. त्याचा प्रत्येक व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी लाईक केला आहे. लोक माईक होल्स्टनला रिअल टारझन म्हणूनही ओळखतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man sleep with giant anaconda snake and read book on bed in america dog lounging beside him shocking video viral sjr