सध्या सोशल मीडियावर मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मेट्रो हाच एक ट्रेंड बनला आहे की? काय असा प्रश्न पडावा एवढे मेट्रोतील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये कधी मेट्रोच्या आत नाचत रील बनवताना तर कधी टॉवेलवर मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या मुलांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक लोक फेमस होण्यासाठी मेट्रोत काहीही स्टंट करत असतात.

मात्र, सध्या एका मुलीचा असा व्हिडीओ व्हायरल होत जो पाहून तुम्ही तिचं कौतुक कराल. या व्हिडीओत एक मुलगा मेट्रोच्या सीटवर बसला असताना त्याला झोप येते. काही वेळाने तो गाढ झोपेत त्याचा तोल जाऊन तो पडणार इतक्यात शेजारी बसलेली मुलगी त्याला सावरते. या मुलीचं धाडस पाहून तुम्हीदेखील तिचं कौतुक कराल.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…

हेही पाहा- शाळकरी मुलं परेड करतायत की पोलिस भरतीचा सराव? व्हिडीओ पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मेट्रोत सर्व प्रवासी सीटवर बसलेले असताना निळा टी-शर्ट घातलेला एका मुलाची गाढ झोप लागते. झोपेत तो हळू हळू सीटवरून पुढे सरकू लागतो. तेवढ्यात शेजारी बसलेल्या मुलीची नजर त्याच्यावर पडते. तिला हा मुलगा झोपत पुढे पडणार असल्याचा अंदाज येतो. तोपर्यंत मुलगा सीटवरून खाली घसरतो तो खाली पडणारी इतक्यात मुलगी त्याचा टी-शर्ट धरते आणि त्याला मागे ओढते त्यामुळे मुलगा स्वत:ला सावरतो आणि डोक्यावर न पडता हातावर आपला तोल सांभाळतो. मुलीने मुलाला पडताना वाचवल्याचं पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

हेही पाहा- Video: विजेच्या खांबावर चढून प्रेयसीला केला Video Call; मोठ्याने आय लव्ह यू म्हणाला अन्….

या व्हिडीओमध्ये मुलीने केलेलं धाडस पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. कारण अनेकदा मुली अनोळखी व्यक्ती शेजारी झोपलेला दिसला तर तिथे बसणं टाळतात किंवा तेथून पळ काढतात पण या मुलीने त्या अनोळखी मुलगा पडताना दिसताच त्याचा टी-शर्ट पकडत त्याला पडण्यापासून वाचवल्याचं पाहून नेटकरी मुलीचं कौतुर करत आहेत. तर मेट्रोमध्ये झोपलेल्या मुलावर राग काढत आहेत. कारण मेट्रोमध्ये कोणी एवढ्या शांत झोपू शकत नाही असंही लोक म्हणत आहेत. दरम्यान, एवढ्या लोकांसमोर झालेल्या बेइज्जतीमुळे हा मुलगा पुन्हा मेट्रोत झोपणार नसल्याचंही लोकं म्हणत आहेत.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर Md Moeen Shaikh नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत सुमारे लाखो लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर लोक मजेशीर कमेंटही करत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की ‘गरीब माणूस डे-नाईट दोन्ही ड्युटी करत असल्याचं दिसतं आहे.’

Story img Loader