लोकांना फार विचित्र गोष्टींची हौस असते. काही गोष्टी इतक्या विचित्र असतात की ऐकूनच धक्का बसतो. अशीच काहीशी हौस एका व्यक्तीला आहे. या व्यक्तीला लहानपणीपासूनच कुत्रा होण्याची हौस होती. ही हौस पूर्ण करण्यासाठी त्याने तब्बल १२ ते १६ लाख(साधारण $ २०,०००) रुपये खर्च केले आणि तो कुत्रा झाला आहे. तुम्हाला हे सर्व ऐकून विश्वास बसणार नाही. पण हे खरचं घडले आहे.

व्यक्तीच्या कुटुंबियांना आणि मित्रांना समजले तेव्हा त्यांना धक्काच बसला. व्यक्तीने घरात कुत्र्यांसारखे वागायला सुरुवात केली आहे. तो घरात पाळीव कुत्रा असल्यासारखा राहत आहे. त्यानी आपल्या आवडीच्या प्रजातीचा कुत्रा होण्याचा निर्णय घेतला आहे.

जपानमध्ये माणूस झाला कुत्रा

हे सर्व प्रकरण जपानमधील आहे. टोको नावाच्या व्यक्तीने कुत्र्यासारखे दिसण्यासाठी एक कॉस्ट्युम तयार केला आहे. त्यावरच आपले सर्व पैसा खर्च केला आहे.

हेही वाचा – ऑर्डर न करता महिलेच्या घरी अ‍ॅमेझॉनने पाठवली शंभरहून अधिक पार्सल, आता कारमध्ये घेऊन फिरते वस्तू…, का ते जाणून घ्या

टोकोच्या मते,लहानपणीपासूनत त्याला कुत्रा व्हायचे स्वप्त होते आणि तो आपले स्वप्न पूर्ण करणयासाठी महिन्यातून कित्येकदा कुत्र्यासारखा कॉस्ट्यूम परिधान करतो. त्याचा युट्युब चॅनेल देखील आहे जिथे तो कुत्र्यांसारखे खोतो आणि खेळताना दिसतो. पण अशा प्रकारे घराबाहेर जाण्यासाठी घाबरतो. पहिल्यांदा घराबाहेर पडला आणि त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

कुत्र्यासारखे काम करतो टोको

टोको सांगतो की, ”मी क्वचितच याबाबत माझ्या मित्रांना सांगतो कारण मला वाटते की, ते मला विचित्र समजतील. माझ्या कुटुंब आणि मित्रांना मी कुत्रा झालो आहे हे समजल्यानंतर धक्का बसला होता.”

हेही वाचा – निर्दयीपणा! पाणी मागितल्याने पीआरडी जवानांची दिव्यांग व्यक्तीला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

त्याने सांगितले की, ज्या गोष्टी कुत्रा करतो ते करण्यात मला मज्जा येते. त्यामुळे त्यांला असे वाटते की, तो एक पाळीव प्राणी आहे. तो कुत्र्याचे फूड खाताना आणि आणि घरामध्ये वावरता आपले व्हिडीओ पोस्ट करतो. पण कपड्यांमध्ये माणसासारखी हालचाल करणे अवघड आहे. टोको सांगितले की, हा कॉस्ट्यूम तयार करण्यासाठी ४० दिवस लागले होते.

Story img Loader