अमेरिकेमध्ये जॉर्जिया येथे राहणाऱ्या २७ वर्षाच्या डॅनिअल सिगनर्सला कमी उंचीमुळे अनेक महिल नकार देत होत्या. वारंवार नकार मिळाल्यामुळे तो फार वैतागला होता. शेवटी त्याने आपली ही कमतरता दूर करण्याचे ठरवले. त्यासाठी तब्बल ६६ लाख रुपये खर्च केले आणि लेंथनिंग सर्जरी केली आहे. यासर्जरीसाठी त्याला ८१,००० डॉलर(साधारण ६६, ४४,१०६ रुपये) खर्च करावा लागला. आता त्यांची लांबी ५ फूट ५ इंचावरून वाढवून ६ फूट झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्यभर कमी उंचीमुळे डॅनिअलला सहन करावा लागला त्रास

न्युऑर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, नेव्हीमध्ये काम करणाऱ्या सिगनर्सचे म्हणणे आहे की, ”आपले संपूर्ण आयुष्य मी एक छोटा उंचीचा व्यक्ती असल्यामुळे त्रास सहन केला आहे. आणि मी हे बदलण्यासाठी मी काही केले तरी काहीच फरक पडत नाही असे मला नेहमीच जाणवत होते. लिब लेंथनिगमुळे मला माझे आयुष्य बदलण्याचे आणि संपूर्णपण जगण्याची संधी मिळाली आहे.”

हेही वाचा- बाईकचा टेबल अन् प्लॉस्टिक पिशवीची प्लेट! घाईघाईत जेवत होता भुकेला डिलिव्हरी बॉय; Video पाहून नेटकरीही झाले भावूक

कमी उंचीमुळे वारंवार महिलांकडून मिळत होता नकार

त्याने सांगितले की,सर्वात आधी त्याच्या क्रशने त्याला रिजेक्ट केले होते कारण त्याचे वय आणि उंची दोन्ही खूप कमी होती. त्याची म्हणणे होते की, मी तिथेच थांबलो आणि महिलांच्या समोर जाण्यापूर्वी आपल्या उंचीचा विचार करू लागलो, ज्यामुळे मी अनेकदा कित्येक संधी गमावल्या. अहवालानुसार, सिगनर्सने कित्येक वर्ष यासाठी रिसर्च केला. त्यानंतर त्याला एक उपाय सापडला. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यान आपले पाय दाखवले आहे. त्यासोबत त्याने आपला फोटो देखील शेअर केला आहे.

हेही वाचा – बापरे! डोळ्यादेखत एटीमएम मशीनमध्ये शिरला भल्ला मोठा साप! Viral Video पाहून अंगावर येईल काटा

लोकांनी डॅनिअलला दिल्या शुभेच्छा

सिगनर्सच्या पोस्टवर खूप लोकांनी कमेंट करून शुभेच्छा दिल्या. लोकांचे म्हणणे आहे की, ”असे करून तो एक उदाहरण ठरतो आहे.” तर काही लोक त्याला ट्रीटमेंटबाबत विचारत आहे. एका यूजरचे म्हणणे आहे की,”तुम्हाला एक चांगली बायको मिळेल”. तर आणखी एका यूजरने सांगितले की, ”हिलिंग प्रोसेसमध्ये किती वेळ लागतो”’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man spends inr 66 lakhs on limb lengthening surgery after facing rejection for being too short snk
Show comments