सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओ पाहिल्यानंतर आपण हसतो आणि कधीकधी तर आपल्याला हसू आवरत नाही. अनेकदा असं घडतं की आपल्या समोर जुने व्हिडीओ येतात पण ते व्हिडीओ इतके मजेदार असतात की एकदा पाहून मन भरत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती खचाखच गर्दीने भरलेल्या मुंबई मेट्रोमध्ये घुसण्यासाठी बरीच मेहनत घेतो. तरीही त्याला मेट्रोमध्ये घुसता येत नाही. मग अशा वेळी तो एक अशी शक्कल लढवतो, की ती पाहून तुम्हीही हैराण व्हाल. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मुंबई मेट्रोमध्ये कसा प्रवेश करतो हे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तसा जुना असला तरी सध्या तो खूप वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मोठ्या कष्टाने मेट्रोमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. असं म्हणतात की मुंबई शहर कधीच कुणासाठी थांबत नाही. लोक नोकरीसाठी मेट्रो किंवा ट्रेनने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या या मुंबईच्या बरोबरीने लोकांना धावावं लागतं. मुंबईत गर्दी ही सामान्य बाब झाली आहे. मुंबईतल्या गर्दीतून प्रवास करण्यासाठी टॅलेंट लागतं, हे खरंय. याचीच प्रचिती देणारा हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात पाहू लागले आहेत.

आणखी वाचा : भांडता भांडता एस्केलेटरवरून पडले तरीही लाथा-बुक्क्या सुरूच! पाहा हा मजेदार VIRAL VIDEO

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुंबई मेट्रो प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली आहे. ही मेट्रो लोकांच्या गर्दीने इतकी भरली की बाहेरून दुसऱ्या माणसाला साधं पायही ठेवण्यासाठी जागा उरत नाही. असाच एक बाहेरून एक व्यक्ती या मेट्रोमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. पण लोकांची गर्दी इतकी असते की त्यात त्याला घुसता येत नाही आणि तो पुन्ही बाहेर पडतो. त्याचा हा प्रयत्न पाहून आजुबाजूचे लोकही त्याला नको चढू असं सांगताना दिसतात. पण हार मानेल तो मुंबईकर कसला? या व्यक्तीने अशी एक शक्कल लढवली की एका मिनीटात हा व्यक्ती मेट्रोमध्ये घुसला.

बराच प्रयत्न करूनही या व्यक्तीने काही हार मानली नाही. मेट्रो सुरू होण्यापूर्वी आधी सर्व दरवाजे आपोआप बंद होतात. मग या व्यक्तीने मेट्रोचा दरवाजा पुढे सरकण्याअगोदरच पुन्हा आत घुसला. जस जसा दरवाजा पुढे सरकतो तसा तसा तो मेट्रोच्या आत ढकलला जातो आणि अखेर तो व्यक्ती मेट्रोमध्ये घुसण्यात यशस्वी होतो.

आणखी वाचा : मासेमारी करताना अचानक विशालकाय मासा दिसला, VIRAL VIDEO पाहून हादरून जाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ऐकू आणि बोलू शकत नाही, तरीही नाशिकमधलं हे जोडपं पाणीपुरीचा स्टॉल चालवतं!

हा व्हिडीओ Gina Kholkar नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना फार आवडू लागलाय. हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ३ लाख ५० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी हा व्हिडीओ पाहून असे कृत्य कधी कधी मृत्यूला आमंत्रण देऊ शकतं असं देखील सांगितलं. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. तर काही यूजर्सनी असा प्रयत्न करण्याचं आवाहन केलंय.