Lion Attack Man Video: वाघ, सिंह, बिबट्या असे प्राणी पाहायचे असतील, तर आपल्याला जंगलात, नॅशनल पार्क किंवा प्राणिसंग्रहालयात जावं लागतं. हे प्राणी समोर दिसताच धडकी भरतेच; पण त्यांच्याबरोबर फोटो काढण्याचा मोहही अनेकांना आवरत नाही. अशाच मोह न आवरलेल्या माणसाने एका सिंहाबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न केला. पण, पुढे जे घडलं, ते धडकी भरवणारं आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकऱ्यांचे धाबे दणाणले. व्हिडीओ क्लिपमध्ये एक माणूस पाळीव सिंहाबरोबर पोज देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते; परंतु पुढच्याच क्षणी त्या पाळीव सिंहाची शिकार करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती जागी होते आणि तो क्रूर शिकारी बनून त्याची मान आपल्या जबड्यात पकडतो. लोकांना वन्य प्राण्यांबरोबर सेल्फी काढण्याची किंवा त्यांच्याजवळ जाण्याची इच्छा कितीही जबरदस्त असली तरी ती किती धोकादायक असू शकते याबद्दल हा व्हिडीओ एक प्रकारे इशारा देतो.
शारजाह टीव्ही (SBA) च्या माजी अँकर जरनब खान लशारी यांनी हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट @zarnab.lashaari वर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “जेव्हा तुम्ही सिंहाबरोबर पोज देण्याचा प्रयत्न करता तेव्हा काय होते?” तथापि, हा हृदयद्रावक व्हिडीओ कधी आणि कुठे रेकॉर्ड करण्यात आला त्याबद्दल त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक पाळीव सिंह पायऱ्यांवर बसलेला दिसतो. दरम्यान, एक जण सिंहाबरोबर फोटो काढण्यासाठी पायऱ्यांवर जाऊन बसतो. पण, त्या माणसाला कल्पनाही नव्हती की, पुढच्याच क्षणी त्याच्याबरोबर खूप काहीतरी वाईट घडणार आहे.
व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, सिंह क्षणार्धात थेट त्या माणसाच्या मानेवर हल्ला करतो. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले सर्व जण घाबरले आणि फोटो काढणाऱ्या व्यक्तीचा आत्मा तर काही काळासाठी त्याच्या शरीरातून निघून गेल्यासारखे वाटलं. सुदैवाने काळजीवाहक जवळच होता आणि त्याने सिंहाच्या तोंडावर थाप मारून त्याचे लक्ष विचलित केले.
तथापि, त्या व्यक्तीच्या मानेवर सिंहाच्या तीक्ष्ण दातांच्या आणि त्या सिंहाने घेतलेल्या चाव्यामुळे झालेल्या जखमेतून वाहणाऱ्या रक्ताच्या खुणा दिसून येतात. हा व्हिडीओ खरोखरच भयानक आहे. माजी अँकर जरनाब यांनी त्यांच्या पोस्टच्या शेवटी लिहिले, ‘आता मला सांगा की, तुम्ही सिंहाजवळ बसून तुमचा फोटो काढण्याची हिंमत कराल का?”
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका वापरकर्त्याने कमेंट केली, “जणू काही तो माणूस स्वतःला सिंहाची शिकार होताना पाहू इच्छित होता.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “काळजीवाहकाने सिंहाला थप्पड मारली हे पाहून मला आश्चर्य वाटले.” दुसऱ्या एका युजरनेही कमेंट केली की, “सिंहाला थप्पड मारली. तुम्हीही ते पाहिले का?”