अंकिता देशकर

Man Standing On Helicopter Fan Video: लाईटहाऊस जर्नालिज्मला एक व्हिडिओ ट्विटर वर शेअर होत असल्याचे लक्षात आले. या व्हिडीओमध्ये एक माणूस हेलिकॉप्टरच्या पंख्यावर उभा राहिलेला दिसत आहे. अर्ध्या व्हिडिओनंतर सदर व्यक्ती पंख्यावर उभा असतानाच हेलिकॉप्टरचे पाते आकाशात उड्डाण घेते. यावेळी हेलिकॉप्टर जमिनीवरच असते. नेमकं हे शक्य कसं झालं आणि या धोकादायक प्रकारासाठी परवानगी कशी देण्यात आली याविषयी सविस्तर जाणून घेऊया..

A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
drones paragliding banned in pune on occasion of pm narendra modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त ड्रोन, पॅराग्लायडर उड्डाणास बंदी; आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Young Girl Performs Lavani Dance
गौतमी पाटील तरुणीसमोर फेल! सादर केली सुरेख लावणी, VIDEO होतोय व्हायरल
Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Terrifying Video of father saving his children life from accident video went viral on social media
हा VIDEO पाहून कळेल आयुष्यात वडिलांचं असणं किती गरजेचं, बापाने मरणाच्या दारातून लेकराला आणलं परत, पाहा नेमकं काय घडलं
Video of young girl doing stunt with little kid went viral on social media
VIDEO: उंचावरून उडी मारली अन्…, चिमुकल्याला घेऊन तरुणीने रस्त्यावर केला जीवघेणा स्टंट, पाहा नेमकं काय घडलं?

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर युजर Jiyaul khan ने व्हायरल व्हिडिओ शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हायरल व्हिडिओवरून मिळालेल्या फ्रेमवर गुगल रिव्हर्स इमेज सर्च चा वापर करून आम्ही आमचा तपास सुरू केला. आम्हाला एक ट्विट MBG CORE Official या ट्विटर हॅन्डल वर सापडले. ट्विट मध्ये rokoko.com या वेबसाईटला क्रेडिट्स देण्यात आले होते.

आम्हाला MBG CORE इन्स्टाग्राम पेजवर व्हिडिओ आणि त्याची निर्मिती देखील आढळली.

आम्हाला युट्युब शॉर्ट्स वर देखील या व्हिडिओ ची निर्मिती कशी करण्यात आली ते दर्शवण्यात आले होते.

MBG Core च्या बायो मध्ये लिहले होते की, हे एक CGI 3D generalist आहे आणि या पेजचे एक दशलक्षपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.

आम्ही प्रत्यक्ष पडताळणीसाठी या पेजला मेसेज द्वारे संपर्क केला, त्यांनी सांगितले, “मी C4D/Redshift/Marvelous designer/Rokoko smartsuit Mocap/After effect सह हा व्हिडिओ बनवला आहे.”

निष्कर्ष: एक माणूस हेलिकॉप्टरच्या पात्यावर/ ब्लेडवर बसलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे, हा व्हिडिओ CGI वापरून तयार करण्यात आला आहे, व्हिडिओ खोटा आहे.