एखाद्या फळाचे सरबत किंवा आईस्क्रीम असो ते थंडगार खाण्यात किंवा पिण्यातच खरी मजा असते. साधारपणे पदार्थ किंवा एखादा पेय थंडगार ठेवण्यासाठी बर्फाचा उपयोग करण्यात येतो. पण, तुम्ही कधी असं ऐकलंय का ? की, एखाद्या व्यक्तीने तीन तास बर्फात उभं राहून विश्वविक्रम केला आहे. नाही, तर आज सोशल मीडियावर असंच काहीस पाहायला मिळालं आहे. एका व्यक्तीने तीन तास बर्फात उभं राहून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका काचेच्या बॉक्समध्ये एक व्यक्ती उभी आहे. तसेच अनेक बर्फाचे तुकडे बॉक्समध्ये इतर माणसांच्या मदतीने ठेवले जात आहेत. व्यक्तीचा फक्त चेहरा दिसतो आहे ; इतके बर्फ या बॉक्समध्ये भरून ठेवले आहेत. त्यानंतर टाइमर लावला जातो आणि अनेक जण हे दृश्य कॅमरामध्ये कैद करून घेताना दिसत आहेत. तर व्यक्ती नक्की किती वेळ बर्फात बसून राहिली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.
हेही वाचा…मेट्रोने प्रवास करताना घ्या काळजी! तुमच्याबरोबरही घडू शकते ‘अशी’ घटना; पाहा VIDEO
व्हिडीओ नक्की बघा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, बघता बघता व्यक्ती चक्क तीन तास बर्फात उभी राहते. यापूर्वी या व्यक्तीने २ तास, ३५ मिनिटे, ३३ बर्फात बसून राहण्याचा रेकॉर्ड केला होता. तर यावेळी तीन तास बर्फात बसून व्यक्तीनं स्वतःचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तीन तासानंतर त्यांना या काचेच्या बॉक्समधून बाहेर काढण्यात आले आणि गरम कपड्यात तिला गुंडाळून ठेवण्यात आले व त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली.
रिमझिम पावसात, बर्फात तीन तास उभा राहून पोलंडमधील व्हॅलेरजान रोमानोव्स्की यांनी जागतिक विक्रम मोडला आहे आणि सर्वात जास्त वेळ बर्फात उभं राहण्याचा विश्व विक्रम स्वतःच्या नावावर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @GWR यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.