कधीकधी काही लोकं प्राण्यांना खूप हलक्यात घेतात आणि त्यांच्याशी थट्टा मस्ती करायला लागतात; पण तोच प्राणी जेव्हा व्यक्तीवर हल्ला करतात तेव्हा लोकं खूप घाबरून जातात. त्यात असे काही लोकं आहेत जी धोकादायक प्राण्यांपासून काही अंतर ठेऊन चालतात. मग ते रस्त्यावर फिरणारे कुत्रे असोत की बैल. पण एका व्यक्तीने त्याची मर्यादा तेव्हा ओलांडली, जेव्हा त्याने धोकादायक मगरीच्या पाठीवर बसून नाचण्याचा विचार केला. प्राणीसंग्रहालय किंवा नदीत असलेल्या मगरीजवळ जायलाही लोकं घाबरतात, पण या व्यक्तीने असे काही केले की त्याने लोकांना वेठीस धरले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक माणूस एका महाकाय मगरीजवळ कसा जातो आणि त्याच्या पाठीवर बसून नाचू लागतो.

मगरीच्या हल्ल्यात ही व्यक्ती थोडक्यात बचावली

व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, ती व्यक्ती जशी मगरीच्या जवळ येताच ती मगर जबड्याने हल्ला करते. मात्र सुदैवाने तो माणूस त्या मगरीपासून काही अंतरावर उभा असतो. मात्र ती व्यक्ती काही सेकंदांनंतर मगरीच्या पाठीवर बसते आणि दोन्ही हात वर करून नाचू लागते. तसेच हे पाहून आजूबाजूला उभे असलेली लोकं खूप घाबरले, पण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती.

व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. wildlife_stories_ या नावाने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर होताच लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले की, ‘ती मगर हळू हळू तोंड उघडत होती, मला वाटते की ती व्यक्ति आणखी काही सेकंद त्या मगरीजवळ थांबली असती तर कदाचित त्या व्यक्तीला खाऊन टाकले असते.’

Story img Loader