Viral video: अनेक सोशल मीडियावर साहसी व्हिडीओ व्हायरल होत आहेत. काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार या तरुणासोबत घडला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने गोठलेल्या तलावात पोहण्यासाठी उडी मारली आहे. मात्र नंतर पाण्याखाली त्याला पुढचा मार्गच सापडत नाही, यावेळी व्यक्तीला कसा तरी जीव वाचवावा लागतो. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गोठलेल्या बर्फाखाली असणाऱ्या पाण्यात पोहताना दिसत आहे. हे पाहून तुम्ही भीतीने थरथर कापू शकता कारण ती व्यक्ती बर्फाखाली आहे आणि बाहेर येण्याचा एकच मार्ग आहे. काही अंतर गेल्यावर ती व्यक्ती घाबरते आणि इकडे तिकडे पोहायला लागते. त्याच्याकडे बघून तो बाहेरचा रस्ताच विसरल्यासारखं वाटतं. वर उपस्थित असलेले त्याचे साथीदार त्याला बाहेर काढण्यासाठी बर्फ तोडण्याचा प्रयत्न करू लागतात, त्याच्यावर उडी मारतात पण बर्फ तुटत नाही. पण पोहणाऱ्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी आत असलेली दोरी सापडते. दोरी पकडून तो पोहतो आणि अखेर बाहेर येतो.
काही जण सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी भन्नाट स्टंटबाजी करण्याच्या उत्साहात स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. या तरुणानेही धोका पत्करून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> रस्त्यावर पडलेल्या वृद्ध महिलेला मदत करणं पडलं महागात; जीव वाचवून पळू लागले लोक; VIDEO पाहून कळेल कारण
व्हायरल व्हिडिओवर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘त्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘असे काम करू नका की तुमचा जीव जाऊ शकतो.’ त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, ‘खूप धोकादायक व्हिडिओ.’@hinesebrain9 नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. वारंवार अशाप्रकारच्या अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, मात्र तरीही तरुणाई यातून धडा घेताना दिसत नाही.