man steals ex-girlfriends pet chicken after Heartbreak Viral Video : प्रेमभंग झालेला व्यक्ती काय करेल हे कोणीही सांगू शकत नाही, अशाच एक विचित्र घटना नुकतीच समोर आली आहे. ज्यामध्ये एक ५० वर्षीय व्यक्तीला त्याच्या एक्स गर्लफ्रेंडची पॉली नावाची पाळीव कोंबडी चोरल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही घटना २९ मार्च रोजी घडली. दरम्यान या कोंबडी चोरणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील किटसॅप काऊंटी शेरीफ कार्यालयाला ९११ क्रमांकावर एक फोन कॉल करण्यात आला. हा फोन करणाऱ्या महिलेने तिचा एक्स बॉयफ्रेंड तिच्या घरात घुसला आणि तिची पाळीव कोंबडी घेऊन पळून गेल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान अधिकाऱ्यांनी तात्काळ या महिलेच्या तक्रारीची दखल घेतली.

मियामी हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने सांगितलं की तिच्या पूर्वीचा बॉयफ्रेंडने कोंबडी चोरण्यासाठी तिच्या घराचे मागचे दार तोडलं, ज्यामुळे तिने शेरीफच्या डेप्युटींनी तातडीने कारवाई करण्याची विनंती केली. दरम्यान किटसॅप काऊंटी शेरीफ ऑफिसकडून त्या व्यक्तीला जंगलात पकडण्यात आले तेव्हाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

शेरीफ ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार कोंबडी घेऊन जवळच असलेल्या जंगलात पळून जाताना तो व्यक्ती ‘माझ्याकडे पॉली आहे’ असे वारंवार ओरडत होता. तसेच शोध घेतल्यानंतर डेप्युटीजना तो झुडुपांमध्ये रडत बसल्याचे आढळून आले, तसेच त्याने कोंबडीला हातात धरून ठेवले होते.

जेव्हा अधिकारी त्याच्या जवळ गेले तेव्हा देखील तो ‘माझ्या कोंबडीला इजा करू नका’ अशी विनंती करत होता. शेरीफ ऑफिसने या प्रसंगाचे बॉडीकॅम फुटेज सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले आहे. दरम्यान कोंबडी चोरल्याप्रकरणी या व्यक्तीला अटक करण्यात आली असून ती कोंबडी तिच्या मालकाला परत करण्यात आली आहे.

दरम्यान हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक जण यावर प्रतिक्रिया देखील देत आहेत. अनेकांनी या व्हिडीओखाली मेजेशीर कमेंट्स केल्या आहेत.