काही लोकांना सगळ्यांपेक्षा हटके करायची सवय असते. आता हटके वगैरे करण्याच्या नादात आपला जीव जाईल किंवा हात पाय तरी मोडतील याची कदर त्यांना नसते. भिती हा प्रकार काहींना ठाऊकच नसतो. कोणतीही गोष्ट समोर आली की ती न घाबरता करायची इतकच माहिती. आता याच वेडापायी एक जण चक्क अजगरांच्या पिंज-यात जाऊन बसला.
अजगर समोर आला तर आपली काय अवस्था होईल हा विचार आला तरी कित्येकांना कापरे भरेल. त्यांच्यासोबत बसणे तर दुरच राहिले पण एका माणसाने आपल्या वेडापायी अजगरांच्या पिंज-यात धाव घेतली. इतकेच नाही तर या पिंज-यात भल्या मोठ्या अजगरांचा वावर असतानाही अगदी बिंधास्त त्यांच्यासोबत तो जाउन बसला आणि त्याचा व्हिडिओ देखील काढला. जे ब्रीवर असे त्याचे नाव असून त्याला अजगरांची खूप आवड आहे. त्यामुळे अजगर ठेवलेल्या पिंज-यात जाऊन तो बसला. या अनेपेक्षित पाहुण्याला आपल्या घरात पाहून कदाचित रागावलेल्या एका अजगराने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकाराचे जे  व्हिडिओ शुटींग करत होता. हे चालू असताना पांढ-या अजगराने रागाने त्यावर हल्ला देखील केला. त्यानंतर त्याचा चावा देखील घेतला पण तरीही न घाबरता आपले चित्रिकरण करावे असे तो कॅमेरामनला सांगत होता.

Story img Loader