आपण अनेक प्रकारची कला प्रदर्शने पाहत असतो. त्यामधील काही गोष्टींचे अर्थ आपल्याला समजतात; तर काही ‘बंपर’ जातात म्हणजे त्याचा अर्थबोधच होत नाही. अशाच एका वैचारिक कलाकाराने [Conceptual Artist] इंग्लंडच्या वूडस्टॉक, ऑक्सफर्डशायर या ३०० वर्षांहून अधिक जुन्या घरात असलेल्या ब्लेनहाइम पॅलेसमध्ये तब्ब्ल ४८ लाख पौंड म्हणजे अंदाजे ५०,५४,३४,५६१.१२ रुपये किमतीचे सोन्याचे टॉयलेट हे प्रदर्शनाचा एक भाग म्हणून लावले होते. परंतु, एका चोराने चक्क चालू अवस्थेतील ते टॉयलेट प्रदर्शनाच्या ठिकाणाहून चोरून नेले होते. नंतर त्याने त्या चोरीची कबुलीदेखील दिली आहे, अशी माहिती ‘द गार्डियन’च्या अहवालावरून मिळते. ते टॉयलेट सप्टेंबर २०१९ सालच्या प्रदर्शनाचा एक भाग होते.
‘अमेरिका’ नावाचे हे तब्बल ५० कोटीं रुपयांचे आलिशान कमोड, इटलीच्या प्रसिद्ध मॉरिझिओ कॅटेलन नावाच्या एका वैचारिक कलाकाराने तयार केले होते. ब्लेनहाइम पॅलेस युनायटेड किंग्डमचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचे जन्मस्थान असल्याने त्या जागेला एक ऐतिहासिक महत्त्व आहे.
हेही वाचा : चोरीसाठी चोरट्याचा अजब जुगाड! कचऱ्याची पिशवी घालून…. Viral Video एकदा बघाच
सोन्याचा टॉयलेट चोरणाऱ्या या चोराचे नाव जेम्स जिम्मी शीन, असे आहे. त्याने न्यायालयात घरफोडी आणि चोरी केलेला माल हाताळल्याची कबुली दिली आहे. मात्र, त्या चोराने जे सोन्याचे टॉयलेट चोरले होते, ते प्रदर्शनादरम्यान प्लम्बिंग करून वापरण्याजोगे करण्यात आले होते. त्यामुळे ते टॉयलेट चोरून नेताना योग्य रीतीने काढले न गेल्याने संपूर्ण प्रदर्शनात पाणी साचून वूडस्टॉकच्या १८ व्या शतकातील राजवाड्याचे भरपूर नुकसान झाले, अशी माहिती ‘न्यूज आउटलेट’च्या अहवालावरून मिळते.
इतकेच नाही, तर शीनला हॉर्स रेसिंग संग्रहालयातील इतर अनेक वस्तूंच्या चोरीसाठी आधीच १७ वर्षांची शिक्षा झाली आहे. मात्र, शीनसह अजून तीन जणांवरही त्या सोन्याच्या टॉयलेटचोरीचा आरोप होता; जो त्यांनी नाकारला आहे. त्यांच्यावर फेब्रुवारी २०२५ मध्ये खटला चालणार असल्याचे एनडीटीव्हीच्या एका लेखावरून कळते.
हेही वाचा : Video : चोरांकडेही क्रिएटिव्हिटीची कमी नाही! पाहा, बेकरी लुटण्याआधी केलेले हे ‘प्रकार’….
सध्या अशा चोरांच्या आणि त्यांच्या चोरी करण्याच्या तऱ्हा सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नुकत्याच एका व्हिडीओमध्ये एका चोराने क्लृप्ती लढवून चोरीसाठी स्वतःचे कचऱ्याच्या पिशवीसारखे वेशांतर केले होते. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये एका बेकरीत चोरी करण्याआधी चोराने व्यायाम केल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या व्हिडिओतून पाहायला मिळते.