उत्तराखंडमधील मुख्य वनसंरक्षक डॉ. पी.एम. धकाते यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रात्री काळोखात जंगलाच्या मध्यभागी दुचाकीस्वार आणि आशियाई सिंह यांचा आमना सामना झाला आहे. व्हिडीओमध्ये दोघांमध्ये झालेली चकमक पाहताना तुमच्या अंगावरही काटा येईलय. जेव्हा जंगलाच्या मधोमध दुचाकीस्वार समोर सिंह येतो तेव्हा पुढे काय घडते ते सर्व कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता, सर्वत्र काळाकुठ्ठ अंधार पसरलेला आहे आणि दुचाकीस्वार केवळ त्याच्या बाइकच्या हेडलाइट्सच्या प्रकाशामध्ये जंगलातून जाणाऱ्या पायवाटेने गाडी चालवताना दिसत आहे. अचानक, त्याच्यासमोर एक भव्य अशियाई सिंह अंधारातून बाहेर पडतो आणि दुचाकीस्वाराच्या जवळ येतो. त्याक्षणी सिंहाला पाहून घाबरून जाण्याऐवजी, बाइकस्वार संयम ठेवतो आणि सिंहाला जवळ येऊ देतो. हे दृश्य मनुष्य आणि पशू यांच्यातील परस्पर आदर दर्शवते. दरम्यान सिंह देखील कोणताही धोका पत्करण्याऐवजी, शांतपणे जवळच्या भिंतीवर झेप घेतो आणि दुचाकीस्वाराला त्रास न देता आपला मार्गाने निघून जातो.

Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Image Of Tiger.
Tiger Travel : टी-२२ च्या बछड्याचा ५०० किलोमीटर प्रवास… यवतमाळचा वाघ धाराशिव, सोलापूरात कसा आला?

व्हायरल व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये मानव आणि वन्यजीव यांच्यातील सहअस्तित्वाच्या महत्त्वावर भर देतात. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “रस्त्यावर एका बाईकचा सामना अशियाई सिंहाशी होतो. फक्त गीरच्या जंगलात आढळणारा हा भव्य प्राणी शांतपणे निघून जातो. हा व्हिडिओ आपल्याला आठवण करून देतो की सहअस्तित्व शक्य आहे. वन्यजीवांबद्दलचा आदर राखण्यामुळे अशी जागा तयार होते जिथे मानव आणि प्राणी एकत्र राहू शकतात.”

हेही वाचा – हातात CD घेऊन भल्या मोठ्या कागदाच्या गठ्ठ्यावर बसले बिल गेट्; या ३० वर्षांपूर्वीच्या फोटोमागे आहे एक रंजक किस्सा!

व्हिडिओ पहा:

आशियाई सिंहासारख्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी संवर्धनाच्या प्रयत्नांची गरज अधोरेखित करताना व्हिडिओ नैसर्गिक वातावरणात वन्यजीवांना सामोरे जाण्याचे सौंदर्य आणि आश्चर्य दाखवते.

हेही वाचा – झाडू मारणाऱ्या महिलेच्या अंगावर अचानक पडली धान्यांची पोती, कामगारांनी वाचला जीव; थरारक घटनेचा Video Viral

व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, मी चुकीचा असू शकते पण मला वाटते की, टायगरचे वागणे वेगळे असते का? बिबट्या इतका जवळ आला नसता.” त्यावर उत्तर देताना धकाते यांनी सांगितले की, “जंगलात नेहमीच अनपेक्षित गोष्टींची शक्यता जास्त असते.” दुसऱ्याने लिहिले, “सहअस्तित्व की घुसखोरी? तोच दुसरा मार्ग आहे”

Story img Loader