Crowded Train Viral Video : भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण ट्रेनमधील एका व्हायरल व्हिडीओने अनेकांच्या झोपा उडवल्या आहेत. एका तरुणाला टॉयलेटला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चक्क तारेवरची कसरतच करावी लागली. कारण ट्रेन प्रवाशांनी खचाखच भरलेली असल्याने त्या तरुणाला टॉयलेटला जाण्यासाठी रस्ता मिळाला नाही. त्यामुळे त्याने थेट वरच्या सीटवरून स्पायडर मॅनसारखी पावलं टाकत रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण भयानक प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे आम आदमी पार्टीचे नेते नरेश बाल्यान यांनी हा व्हिडीओ ट्वीटर अकाऊंटवर शेअर करून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नरेश बाल्यान ट्वीटवर म्हणाले की, “रेल्वेची अशी परिस्थिती आहे. या गरमीच्या दिवसात प्राण्यांपेक्षाही वाईट अवस्था आहे. अश्विनी वैष्णव देशाचे एकमेव रेल्वेमंत्री आहेत, जे या मंत्रीपदावर आतापर्यंत टिकून राहिले आहेत. हजारो लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही ते या पदावर काम करत आहेत. ९ वर्षात एकही नवीन ट्रेन दिली नाही. तिकिटाची किंमत दुप्पटीपेक्षाही अधिक केली, अशा शब्दांत बाल्यान यांनी वैष्णव यांच्यावर घणाघात केला आहे.”

नक्की वाचा – Viral Video: मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या तरुणीवर तोंड लपवायची वेळ का आली? व्हिडीओ क्लीप पाहून थक्क व्हाल

इथे पाहा व्हिडीओ

ट्रेनमध्ये दिवसेंदिवस वाढणारी गर्दी पाहता प्रवाशांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ट्रेनमध्ये ज्या काही धक्कादायक घटना घडतात, त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून रेल्वे विभागाला टॅग केलं जातं. परंतु, त्यानंतरही तातडीने उपाययोजन करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचं नेटकरी प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगतात. या व्हिडीओला प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्याने म्हटलं की, ‘ही रेल्वेची परिस्थिती आहे. प्राण्यांपेक्षाही वाईट अवस्था आहे.’