Sewer Pipeline Video: इंटरनेटवर रेस्क्यू ऑपरेशनचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका अतिशय मोठ्या गटाराच्या पाईपमधून एका व्यक्तीला बाहेर काढण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये, रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथील पुलकोवो आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्किंगच्या खाली असलेल्या गटाराच्या पाईपमध्ये एक माणूस अडकलेला दिसत आहे. हा माणूस गटाराच्या पाईपकडे साफसफाई करण्यासाठी गेला होता, परंतु काही मीटर आत गेल्यानंतर तो त्यात अडकला. बचावकर्ते येऊन त्यांची सुटका करण्यापूर्वी काहीवेळ तो बाहेर पडण्यासाठी धडपडत होता. त्याने अनेकवेळा प्रयत्न केले, पण तो बाहेर पडू शकला नाही.
आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की जेव्हा त्याला पाईपमधून बाहेर काढले तेव्हा तो शर्टलेस होता, याचा अर्थ त्याने पाईपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याचे कपडे बाहेर ठेवले होते. रेडिट आणि ट्विटरसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही क्लिप दिसली आहे. रेडिटवर शेअर करताना त्यावर कॅप्शन दिले होते की, ‘सेंट पीटर्सबर्गच्या मॉस्कोव्स्की जिल्ह्यात, एक माणूस गटाराच्या पाईपच्या आत गेला आणि डझनभर मीटरच्या आत अडकला. त्याला वाचवण्यासाठी त्यांना रस्ता खणावा लागला. कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओला शेकडो प्रतिक्रिया मिळाल्या.
( हे ही वाचा: Video: अशी गर्लफ्रेंड नको रे देवा! बाईकवरून फिरत होतं जोडपं, पोरीने कॅमेरा सुरू केला अन् तितक्यात…)
भल्यामोठ्या पाईपलाइन मध्ये अडकला माणूस
( हे ही वाचा: Video: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ महिला; उड्या मारत असा डान्स केला की पाहुणेही झाले फिदा)
अशा परिस्थितीत अडकण्याची शक्यता अनेक युजर्सनी व्यक्त केली आहे. एका युजरने कंमेंट केली आहे की, ‘मी काही महिन्यांपूर्वी पहिल्यांदा याबद्दल वाचले होते. माझा क्लॉस्ट्रोफोबिया नवीन स्तरावर पोहोचला आहे. कोणी असे का करेल? हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून याला असंख्य व्ह्यूज मिळाले आहेत.