रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोक आपला जीव गमावतात, तरीही काही लोक जाणीवपूर्वक आपला जीव धोक्यात घालतात. असाच काहीसा एक बाईक चालवताना दिसत आहे ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या जगात तरुणाई लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध मार्ग शोधत असतात. यात रिल्स आणि सोशल मीडियाच्या नादात अनेकांचा बळी देखील गेल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र तरुणाईवर याचा काहीही फरक पडताना दिसत नाही.
काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जराही बॅलेंस न गामावता अत्यंत सराईतपणे तो स्टंटबाजी करतोय. अत्यंत खतरनाक पण तितकाच अचंबित करणारा हा स्टंट पाहून तुम्ही देखील अवाक् व्हाल. बाईकमधून उडणाऱ्या फटाक्यांच्या ठिणग्या देखील त्याच्या अंगावर उडतायेत मात्र तरी देखील त्यानं आपलं नियंत्रण गमावलं नाही. दरम्यान हा स्टंटबाज तरुण कोण आहे? ही स्टंटबाजी नेमकी कुठे केली जातेय या बद्दल कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण हा व्हिडीओ पाहून नेटकरी मात्र अवाक् झाले आहेत. या तरुणाला हॉलिवूड चित्रपटात काम द्या अशा प्रतिक्रिया देत नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – संतापजनक! जोडप्यानं ओलांडल्या सर्व मर्यादा! कुत्र्याबरोबर केला सेक्स, घटनेचे VIDEO व्हायरल
हे. स्टंटबाजी रोखण्यासाठी पोलिस वारंवार जनजागृती करत असतात. तरीदेखील अनेकजण स्टंटबाजी करत असतात. या स्टंटबाजांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.