रस्त्यावर बेधुंद वेगाने गाडी चालवणाऱ्यांपासून नेहमी सावधगिरी बाळगली पाहिजे, अशा प्रकरणात आपला जीव जाण्याचा धोका असतो. वाहने कमी वेगाने चालवावीत असा सल्ला नेहमीच दिला जातो, पण काही लोक स्वतःला ‘रफ्तार का बॉस’ म्हणवून घेतात. ते विमान उडवत असल्यासारखे वाहन घेऊन रस्त्यावर निघतात. असे लोक अपघाताला बळी पडतात आणि आपला जीव गमावतात. काही वेळा तर अशा वाहनचालकांमुळे इतरांनाही आपला जीव गमवावा लागत असल्याचे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्ते अपघातांशी संबंधित विविध प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. आजकाल असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांचेच थक्क केलं आहे. वास्तविक, व्हिडीओमध्ये एक बाईकस्वार थोडक्यात वाचताना दिसत आहे.

(हे ही वाचा: तुमच्या ड्रीम जॉब शोधण्यासाठी मदत करेल हे Optical Illusion; ‘ही’ टेस्ट घ्या आणि उत्तर मिळवा)

नक्की काय झालं?

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला बसून त्याच्या बाईकवर आराम करत असताना एक वेगवान जेसीबी अनियंत्रितपणे त्याच्या दिशेने येतो. तो नशीबवान आहे कारण, पलीकडून येणारी बोलेरो जेसीबीला धडकते, त्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचतो. अन्यथा हा अपघात ज्या प्रकारे झाला, त्या व्यक्तीचा मृत्यू निश्चित झाला असता किंवा तो गंभीर जखमी झाला असता. पण तो वाचणार हे त्याच्या नशिबात लिहिलं होतं, म्हणून तो वाचला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच भारावून जाल.

(हे ही वाचा: “लोक स्वत:शीच लग्न करु लागली तर हिंदूंची लोकसंख्या कमी होईल”; भाजपा आमदाराचा ‘सोलोगॅमी’ला विरोध)

(हे ही वाचा: Viral Video: १० कुत्र्यांवर एक मांजर ठरली वरचढ, व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा धक्कादायक व्हिडीओ satabhai_ranga_8060 या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत जवळजवळ ८ लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर ७२ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी दुचाकीस्वाराला लकी म्हंटले आहे तर अनेकजण हा व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झाले आहे आहेत.