राजस्थानच्या जोधपूर मध्ये अलीकडे एक ३६ वर्षीय तरुण पोट दुखतंय म्हणून रुग्णालयात दाखल झाला होता, आता पोट दुखी तर किती सामान्य आहे त्यात वेगळं काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असावा. जेव्हा डॉक्टरांनी या तरुणाच्या पोटाचा एक्स-रे काढला तेव्हा जे समोर आले ते पाहून कोणालाही धक्का बसेल. एक्स- रे मध्ये समोर आलेल्या माहिती नुसार या तरुणाने चक्क १ रुपयाची नाणी गिळली होती, आणि ती सुद्धा एक दोन नव्हे तर तब्ब्ल ६३! जोधपूरच्या मथुरादास माथूर रुग्णालयात घडलेला हा प्रकार सध्या बराच चर्चेत आहे. या तरुणावर रुग्णालयाच्या गॅस्ट्रोलॉजी विभागाच्या सुपर स्पेशलिटी विंग मधे पूर्ण २ दिवस ऑपरेशन पार पडले आणि अखेरीस त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

गॅस्ट्रोलॉजी विभागाचे प्रमुख, नरेंद्र भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा या तरुणाचे नातेवाईक त्याला रुग्णालयात घेऊन आले तेव्हा साधारण पोट दुखीचा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले, पण त्या युवकाला होणाऱ्या वेदना या साधारण वाटत नव्हत्या. शेवटी एक्स-रे केल्यावर सत्य परिस्थिती समोर आली. डॉक्टरांना सुरुवातीला तरुणाच्या पोटात धातूचा गोळा दिसून आला नीट पाहिल्यावर यात नाणी दिसू लागली. डॉक्टरांनी याविषयी विचारणा केली असता या तरुणाने आपणच ही नाणी गिळली असल्याची धक्कादायक माहिती दिली.

संबंधित ३६ वर्षीय तरुण हा मानसिक आजारांनी ग्रस्त आहे, आपण डिप्रेशन मध्ये असताना जवळपास १५ नाणी गिळली असल्याचे त्याने कबुल केले, त्यानंतर कदाचित सवयीने त्याने नाणी गिळली असावी असा डॉक्टरांचा अंदाज आहे. या तणावामुळे तरुणाने तब्बल ६३ नाणी गिळली होती. डॉक्टरांनी तब्बल २ दिवस अथक परिश्रमाने या रुग्णाचे प्राण वाचवले. सध्या या तरुणाचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन केले जात आहे.

यापूर्वी सुद्धा अशाप्रकारची अनेक उदाहरणे समोर आली आहेत, अलीकडेच ट्युनिशियाच्या एका महिलेने युटीआयची तक्रार घेऊन इस्पितळ गाठले होते, मात्र डॉक्टरांनी तपास करताच या महिलेच्या गुदद्वारात चक्क काचेची तुटलेली बाटली सापडली होती. ४५ वर्षीय या महिलेने स्वतःच सेक्स दरम्यान ही बाटली वापरल्याचे पुढे कबूल केले होते. चार वर्षांनंतर त्रास होऊ लागल्याने तिला या गोष्टीची जाणीव झाली.

Story img Loader