Man Drowning In River Flood Water Video Viral : गेल्या काही दिवसांपासून भारताच्या काही राज्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. हवामान विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला आहे. परंतु, काही लोक नियमांचं उल्लंघन करून स्वत:चा जीव धोक्यात टाकतात आणि पूराच्या पाण्यात वाहून जातात. अशाच प्रकारचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नदीच्या पुरात एक माणूस वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडलीय. एक व्यक्ती पूराच्या पाण्यात अडकल्याचं समजताच त्याला वाचवण्यासाठी आख्खा गाव धावून आला. परंतु, काळाच्या पुढे सर्वांनाचा हार पत्करावी लागली. कारण सर्व गावकऱ्यांच्या समोर तो व्यक्ती पुराच्या पाण्यात वाऱ्यासारखा वाहून गेला. हा संपूर्ण थरार कॅमेरात कैद झाला आहे.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात एक माणूस वाहून जात असताना गावकरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, पाण्याचा प्रवाह वेगाने जात असल्याने तो माणूस सर्वांसमोर वाहून जातो. ही दुर्देवी घटना भोपाळ येथील असल्याचं बोललं जात आहे.
नक्की वाचा – Optical Illusion: या चित्रात कोणता प्राणी दिसतोय? बैल की हत्ती? क्लिक करुन नीट बघा
इथे पाहा पुरात वाहून गेलेल्या माणसाचा भयानक व्हिडीओ
व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, दरवर्षी काही ना काही घटना घडत असतात. मग आपण या घटनांमधून बोध का घेत नाही? तुम्ही अपघाताला निमंत्रण का देता, लोकांना अशा ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. प्रशसनाकडून लोकांना सुरक्षीत राहण्यासाठी नेहमी सुचना दिल्या जातात. मात्र, आपण त्या नियमांचे उल्लंघन करून जीव धोक्यात टाकतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तसंच या व्हायरल व्हिडीओला ९० हजारांहून अधिक व्यूजही मिळाले आहेत.