Man Take Bath In Metro Train Viral Video: काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोतून प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. संबंधित व्हिडीओत १९ वर्षीय तरुणी ब्रा आणि मिनी स्कर्ट परिधान करून प्रवास करत होती. या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. दिल्ली मेट्रोतील ही घटना ताजी असताना आता अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील मेट्रोत विचित्र प्रकार घडला आहे. ज्यामध्ये एका तरुणाने चक्क मेट्रोत अंघोळ केली आहे.
हा तरुण अंघोळ करत असताना मेट्रोतून प्रवास करणाऱ्या अन्य एका प्रवाशाने संबंधित घटना आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. विविध मीडिया रिपोर्टनुसार, संबंधित घटना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मेट्रोतील आहे.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील मेट्रोत एक तरुण चक्क आपल्या अंगावरील कपडे काढून अंघोळ करताना दिसत आहे. तसेच तो एका मोठ्या पिवळ्या स्पंजने स्वत:चं शरीर स्वच्छ करताना दिसत आहे. विशेष म्हणजे संबंधित मेट्रोच्या डब्यात अनेक महिला आणि पुरुष प्रवास करत होते. असं असूनही तरुणाने कसलीही भीती न बाळगता सर्वांसमोर अंघोळ केली आहे. तरुणाच्या या कृतीची नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. तर काहींनी त्याच्या धाडसाचं कौतुक केलं आहे. विचित्र पद्धतीने आंघोळ केल्यानंतर या तरुणाने आपले कपडे पुन्हा परिधान केले.
मेट्रोतून प्रवास करणाऱ्या तरुणाचा अंघोळ करतानाचा VIRAL VIDEO:
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ फेसबूकवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ जुना आहे. पण दिल्ली मेट्रोतील मिनी स्कर्ट आणि ब्रा घालून प्रवास करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेतील या तरुणाचा व्हिडीओ भारतात व्हायरल होत आहे.