बरेच जण प्रवासासाठी ऑनलाईन कॅब बुक करतात. त्यासाठी विविध ऑनलाइन कॅब बुकिंग ॲपचा वापर केला जातो. विशेषत: विमानतळावर आलेले प्रवासी ऑनलाइन कॅबचा वापर करतात. विशेषत: मुंबई, दिल्ली, बंगळुरुसारख्या शहरांमध्ये प्रवासासाठी अशा प्रकारच्या ऑनलाइन कॅब वापरल्या जातात; पण यात अनेकदा फसवणुकीच्या घटना समोर येतात. अशीच एक घटना मुंबई विमानतळावरून कॅब बुक केलेल्या प्रवाशासोबत घडली आहे. या व्यक्तीने ओला ॲपवरून एक कॅब बुक केली; पण प्रत्यक्षात दुसरीच कॅब आली. त्या कॅब ड्रायव्हरने ॲपमध्ये सुरुवातीला दाखवलेल्या पैशांपेक्षा जास्त पैशांची मागणी केली. मुंबई विमानतळावर घडलेला हा प्रकार @Vinamralongani नावाच्या युजरने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

ट्विटर युजरने आपल्या पोस्टमध्ये घडल्या प्रकाराबद्दल सांगितले की, तो मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला आणि त्याने ‘ओला’वर कॅब बुक केली. यावेळी त्याने ड्रायव्हरला फोन करत टर्मिनल-२ वरील पिकअप भागात येण्यास सांगितले.

in pune katraj person with country made pistol arrested by Crime Branchs Anti Robbery Squad
पिस्तूल बाळगणारा सराइत गजाआड, कात्रज बाह्यवळण रस्ता परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”

मात्र, जेव्हा तो पिकअप भागात गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले की, अॅपमध्ये नमूद केलेला कॅबचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅबवरील नंबर वेगळा होता. पण जेव्हा त्याने ड्रायव्हरला पुन्हा विचारले तेव्हा त्याने ती हीच कार असल्याचे सांगितले. खूप रात्र असल्याने आणि कॅबची वाट पाहणाऱ्या लोकांची रांग मोठी असल्याने तो जास्त काही न बोलता कॅबमध्ये बसला. यावेळी ड्रायव्हरने त्याला राइड सुरू करण्यासाठी पिन नंबर विचारला आणि ॲपमध्ये तो नंबर टाकल्याचा बनाव केला. पण, त्याला त्याच्या फोनमध्ये राईड सुरू झाल्याचे दिसून आले नाही.

त्या संदर्भात ड्रायव्हरला विचारले असता, त्याने नेटवर्क प्रॉब्लेममुळे असे होऊ शकते, असे सांगितले. परंतु, संपूर्ण राइडमध्ये त्याला ॲपमध्ये राइड सुरू असल्याचे दिसलेच नाही. त्या वेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याला पोलिस किंवा ‘ओला सपोर्ट’ला कॉल करायचा होता; पण तो अनोळखी व्यक्तीच्या कॅबमध्ये असल्याने त्याला स्वत:च्या जीवाबाबत कोणताही धोका पत्करायचा नव्हता.

इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर कॅबचालकाने त्याच्याकडे ॲपमध्ये दाखवलेल्या पैशांपेक्षा अधिक रकमेची मागणी केली आणि तेही रोख देण्यासाठी जबरदस्ती केली. यावेळी कॅबमधून उतरल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्या कारचा फोटो घेतला आणि त्याला UPI द्वारे पैसे देतो, असे सांगितले; जेणेकरून केलेल्या पेमेंटची नोंद स्वत:जवळ राहील. तसेच ॲपमध्ये राइड बुक करतानाची मूळ रक्कम ४३१ रुपये होती; पण संबंधित कॅबचालकाने त्याच्याकडून ६८१ रुपये मागितले.

या संपूर्ण घटनेवर पीडित युजरने पुढे सांगितलेय की, माझ्या लक्षात आले होते की, कॅब नंबर आणि काही गोष्टी ॲपमधील माहितीप्रमाणे मिळत्याजुळत्या नाहीत. त्यामुळे त्या कॅबमध्ये मी बसायला नको होते; पण परिस्थितीअभावी माझा नाईलाज झाला. परंतु, एकंदरीतच ही घटना खूप चिंताजनक आहे. कारण- ड्रायव्हर ‘ओला ॲप’चा वापर व्यवसायासाठी करत आहे; तसेच ‘ओला’ला कोणतीही माहिती न देता, अशा प्रकारे लोकांची ने-आण सुरू आहे.

ओला सपोर्ट’ने या ट्विटला प्रत्युत्तर दिले आणि या राइडचा CRN शेअर करण्याची विनंती केली आहे. मुंबईत घडलेल्या या संपूर्ण फसवणुकीच्या प्रकारावर आता सोशल मीडिया युजर्सदेखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका युजरने लिहिलेय की, ओला ही सर्वांत मोठी फसवणूक करणारी कंपनी बनली आहे, असे म्हणू शकता. जर तुम्ही लिंक्डइनवर पाहिले, तर तुम्हाला तक्रारीच दिसतील.

दुसऱ्या युजरने कमेंट केली की, तुम्ही @Olacabs कडून खूप अपेक्षा करत आहात. पण जेव्हा तुम्ही मदतीसाठी कॉल करता तेव्हा त्यांचे सपोटर्सदेखील अपशब्द वापरतात.

तर तिसऱ्या एका युजरने लिहिलेय की, ही खरंच खूप चिंतेची बाब आहे. @Olacabs सोबतच्या माझ्या मागील काही अनुभवांनुसार प्रत्यक्षात आलेले ड्रायव्हर ॲपमधील ड्रायव्हरपेक्षा वेगळे होते. असे पाचपेक्षा अधिक वेळा घडले आहे. म्हणूनच मी आता आपत्कालीन परिस्थिती असल्याशिवाय ‘ओला’ वापरत नाही. त्यामुळे अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुम्ही आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे.