Viral Photo : सोशल मीडियावर दररोज काहीतरी नवीन पाहायला मिळतं. लोक आपले दैनंदिन अनुभव देखील शेअर करतात. आपल्या खाजगी आयुष्यातील लहान-मोठे आनंदाचे क्षण लोक सोशल मीडियावर इतरांबरोबर शेअर करताना दिसतात. असाच एक प्रसंग दिल्लीतील व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या व्यक्तीने केलेल्या या पोस्टवर लोकांच्या भरभरून कमेंट येत असून अनेकांनी हा हृदयस्पर्शी प्रसंग शेअर केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आङे
दिल्लीतील आर्यन मिश्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही पोस्ट केली आहे. ज्यामध्ये एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या पोस्टनुसार मिश्रा हे आपल्या वडीलांना दिल्लीतील आयटीसी या लक्झरी हॉटेलात घेऊन गेले आहेत. वडीलांना या हॉटेलात घेऊन जाणं एखाद्यासाठी इतकं स्पेशल का असेल? तर याचं कारण म्हणजे मिश्रा यांचे वडील हे याच लक्झरी हॉटेलमध्ये १९९५ ते २००० या कालावधीत वॉचमन म्हणून काम करत होते. जवळपास २५ वर्षांनंतर आर्यन मिश्रा हे त्यांच्या आई वडीलांना त्या फाइव्ह स्टार हॉटेलात जेवायला घेऊन गेले.
अमय मिश्रा याने त्याच्या एक्स अकाउंटवरून याबद्दल पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या आई-वडिलांबरोबर आयटीसी हॉटेलमध्ये जेवण करतानाचा फोटो शेअर कला आहे. तसेच त्यांनी या फोटोबरोबर दिलेल्या कॅप्शनमध्ये सांगितलं की, “माझे वडील १९९५-२००० पर्यंत नवी दिल्लीतील आयटीसीमध्ये वॉचमन होते; आज मला त्यांना त्याच ठिकाणी डिनरसाठी घेऊन जाण्याची संधी मिळाली”. नेटकऱ्यांना ही पोस्ट खूपच आवडल्याचे दिसत आहे.
आर्यन मिश्रा यांच्या पोस्टवर अनेक जणांनी कमेंट केल्या आहेत. लोक हा हृदयस्पर्शी प्रसंग शेअर केल्याबद्दल आनंद व्यक्त करत आहेत. अनेकांनी ही पोस्ट शेअर केल्याबद्दल मिश्रा यांचे आभार देखील मानले आहेत. अनेकांनी मुलगा आणि वडिलांच्या नात्याबद्दलही कमेंट केल्या आहेत. या पोस्टला आत्तापर्यंत हजारो लोकांनी लाइक केले असून आणि हजारोच्या संख्येने कमेंट्स देखील करण्यात आल्या आहेत.