सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रँकच्या व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हसवणाऱ्या असतात तर काही पाहून घाबरायला होते. असे बरेच लोक आहेत जे प्रँकच्या नावाखाली इतरांची चेष्टा करतात, त्रास देतात. काहीवेळी इतरांच्या मालमत्तेचे नुकसान केले जाते. सध्या सोशल मीडियावर अतिशय धोकादायक प्रँक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात चक्क रेल्वे ट्रॅकवर सायकल टाकून एक जीवघेणा प्रँक करण्यात आला आहे. जो पाहून लोक केवळ तुम्हालाही शॉक बसेल. यात संबंधीत व्यक्तीने प्रँकच्या नावाखाली सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले ज्यामुळे युजर्स देखील त्याला खडेबोल सुनवत आहेत.

रेल्वे ही सार्वजनिक मालमत्ता आहे, जिचे नुकसान करणे कायद्याने गुन्हा आहे. पण तरीही काही लोक लाईक्स आणि व्ह्यूजसाठी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करत दुसऱ्यांच्या जीवाशी खेळतात. अशाचप्रकारे अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये प्रँकच्या नादात एका व्यक्तीने ट्रेनच्या ट्रॅकवर सायकल फेकली, ज्यानंतर ट्रेन येताच अशी घटना घडली की पाहून कोणालाही धक्का बसेल.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Bird Sitting On Man Frizzy Curly Hair bird confuse and finds warmth in his frizzy nest like hair watch funny viral video ones
कुरळ्या केसांना पाहून पक्षी गोंधळला, घरटं शोधू लागला अन् …; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ‘आज आईचे शब्द…’
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
Rohit Sharma Wakes Up in Bed with T20 world Cup
Rohit Sharma: T20 विश्वचषकासह रोहित शर्माची ‘गुड मॉर्निंग’, ट्रॉफीसह काढलेला सेल्फी व्हायरल
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, रेल्वे स्टेशनवरील एका ट्रॅकवर सायकल पडली आहे. इतक्यात त्या ट्रॅकवरुन एक ट्रेन वेगाने येते आणि सायकलला घसपटत पुढे घेऊन जाते. यादरम्यान मोठा स्फोटही होतो आणि स्टेशनवर सर्वत्र धूर पसरतो. आता ही धक्कादायक घटना कोणी घडवली याचा खुलासा अद्याप झालेला नाही किंवा समोर आलेला नाही, पण हा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

ठाणे रेल्वेस्थानकावरील ‘ते’ दृश्य पाहून लोक पडले गोंधळात; video पाहून म्हणाले, “सीसीटीव्ही आहे की पंखा…”

धक्कादायक प्रँकचा हा व्हिडीओ @PicturesFoIder नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला. तर अनेकांनी कमेंटमध्ये हा फार धोकादायक प्रँक व्हिडीओ असल्याचे म्हटले आहे. तसेच असा प्रँक करणाऱ्याला तातडीने अटक करुन शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

एका यूजरने लिहिले की, ‘हा गुन्हा आहे, हा विनोद नाही. लोकांचा यात मृत्यू होऊ शकला असता’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘हा विनोद नाही. ही अशी गोष्ट आहे ज्यासाठी आरोपींना तुरुंगात टाकले पाहिजे. त्याचप्रमाणे आणखी एका युजरने ‘आजकाल लोकांना काय झाले आहे, ते कुठेही काहीही करत आहेत’.