सोशल मीडियावर आज काल काही काही सतत चर्चेत असतात. कधी मजेशीर व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी धोकादायक आहेत. आपल्याला दररोज काही हटके आणि आश्चर्यकारक व्हिडिओ पाहायला मिळतात. अलिकडेच असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका मुलाने वॉशिंग मशीनची “चाचणी” करण्याच्या नावाखाली दगड ठेवला आहे. त्यानंतर मशीन पूर्णपणे खराब झाली. व्हिडिओ पाहिल्यानंतर, काही लोक त्याचा आनंद घेत आहेत, तर काही लोक त्या मुलाला मूर्ख म्हणत आहेत आणि म्हणत आहेत की,”हा फक्त पैशांचा अपव्यय आहे .”
वॉशिंग मशीनची अशी चाचणी कोण करते?
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता की, एक तरुण वॉशिंग मशीन जवळ उभा आहे. तो मशीन चालू करतो आणि एक भला मोठा दगड त्यात टाकतो. एक दगडाची ताकद पाहण्यासाठी तो वॉशिंग मशीनमध्ये कपड्यांऐवजी दगड टाकतो.
ज्या क्षणी मशीनमध्ये दगड टाकतो त्या क्षणी मशीन जोरजोरात हादरू लागते. तरुण दगड टाकताच तेथून लांब पळतो. काही वेळाने मशीनची अक्षरश: खिळखिळी होते. मशीनचे बाहेरल आवरण तुटलेले दिसते. मशीनमधील ड्रम देखील काही वेळाने तुटतो आणि मशीन पूर्णपणे खराब होते.
व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी चर्चेत
हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. इन्स्टाग्रामवर @xyz_z0ne नावाच्या अकाउंटवर शेअर केलेल्या या व्हिडीओलाआतापर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत आणि मुलाच्या विचित्र प्रयोगाची खिल्ली उडवली आहे. जिथे एका वापरकर्त्याने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले, “भाऊ, तुझे वडील तुझ्या घरी बेल्ट घालत नाहीत का?” दुसऱ्याने लिहिले, “वॉशिंग मशीनचा आत्मा निघून गेला आहे.” तिसऱ्याने लिहिले ,”या चाचण्यांमुळे तिचा अंत झाला आहे” संपले. चौथ्याने लिहिले,”मी तीन वर्षांपासून ते विकत घेण्याचा विचार करत आहे आणि हा माणूस ते खराब करण्याचा प्रयत्न करत आहे.
आणखी एकाने लिहिले की, यापेक्षा एखाद्या गरीबाची मदत झाली असती, आज काल लोकांना काय झाले आहे? दुसऱ्याने लिहिले की, मला कळत नाही लोक कन्टेंटच्या नावाखाली एखादी वस्तू खराब का करत आहे. तुम्हाला मशीन नको होती, तर एखाद्या गरजूला दिली असती”
दुसऱ्याने लिहिले की, काय फालतूपणा आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी वस्तूचे नुकसान कर करत आहे”
तुम्ही प्रयत्न केला आणि यापेक्षा चांगले काही तुम्हाला मिळाले नाही? यापेक्षा चांगला आशय नाही का? म्हणूनच इंटरनेट वाईट होत चालले आहे.