King Cobra Attack Viral Video : सापांना पकडून त्यांचे व्हिडीओ काढण्याचं फॅड दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक जण विषारी सापांसोबक खेळ करुन हिरोगीरी करण्याचा प्रयत्न करतात. पण सर्पदंशामुळं काही तासांतच आपला मृत्यू होऊ शकतो, याचा विसर काही माणसांना पडलेला असतो. सापांना हाताळत असताना सर्पमित्रांचाही मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असं असतानाही काही लोक किंग कोब्रासारख्या खतरनाक सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात.
एका तरुणाने जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक असलेला किंग कोब्रा साप घरात आणला. एखाद्या लहान मुलाला उचलून घेतल्यावर प्रेमाने हवेत फिरवतात, तशाचप्रकारे या तरुणाने किंग कोब्राला गरागरा फिरवायचा प्रयत्न केला. पण शेपटीला हात लावताच किंग क्रोब्रा पिसाळला आणि तरुणाच्या अंगावर धावला. त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. सापाचा हा थरारक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाला आहे.
किंग कोब्रा सापाचा हा व्हिडीओ predatoryfins_official नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हातावर टॅटू असलेल्या या मुलानं किंग कोब्रासोबत खेळ केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. घरात एखाद्या लहान मुलासोबत जशी मस्ती करतात, तसंच काहीसं या मुलाने कोब्रा सापासोबत केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. पण सुरुवातील कोब्राला हाताळत असतान हा मुलगा शेपटीला हात लावतो. त्यानंतर मात्र कोब्रा पिसाळतो आणि त्या मुलाच्या अंगावर धाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, कोब्रापासून हा मुलगा दूर उभा असल्याने कोब्राच्या दंशापासून तो थोडक्यात वाचल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांचा थरकाप उडाला असून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नक्की वाचा – सावधान! एक्स्प्रेसवेवर अतिवेगाने गाडी चालवताय, मग ‘हा’ व्हायरल Video एकदा पाहाच
इथे पाहा व्हिडीओ
साप समोर दिसल्यावर अनेक लोकांच्या अंगावर काटा येतो. कारण साप छोटा असो किंवा मोठा तो जर विषारी असेल तर माणसांचा मृत्यू होतो. सर्पदंशामुळे माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण आताच्या सोशल मीडियाच्या युगात रील बनवण्यासाठी काही लोक सापांसारख्या जीवघेण्या सरपटणाऱ्या प्राण्यासोबत खेळ करत असतात. सापांना हाताळताना थोडीही नजर चुकली तर, साप चावल्याशिवाय राहत नाही. कारण स्नेक शो दरम्यान काही सर्पमित्रांवर विषारी सापांनी हल्ला केल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत.