Lion Viral Video: समाजमाध्यमांवर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. विविध विषयांवरील आधारित व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो; ज्यात डान्स, गाणी अशा अनेक गोष्टी असतातच. पण, बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांचे थरकाप उडवणारे, तर कधी मजेशीर व्हिडीओही आपल्याला पाहायला मिळतात. अनेक वेळा असे व्हिडीओ समोर येतात, जे आश्चर्यचकित करणारे असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही, हे खरंच घडतंय का? असाच एक व्हिडीओ आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. अनेक लोक कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत राहतात. त्यातील काही कारणं आश्चर्यकारक; तर काही कारणं मजेदार असतात. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
वास्तविक एक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये एक तरुण सिंह बनून सिंहांशी लढत आहे. या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका दाट शेतात दोन सिंह दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच वेळी तिसरा सिंहदेखील तेथे आहे; परंतु तो सिंहाच्या वेशभूषेत खरं तर माणूस आहे. जो तरुण आहे तो पूर्णपणे सिंहाच्या वेशभूषेत दिसत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. क्षणभर पाहिल्यावर तुम्ही स्वतः घाबरून जाल. हा तरुण दोन्ही सिंहांसोबत मस्ती करताना दिसत आहे. तो या दोघांसोबत सेल्फीही काढत आहे. हे सिंहही खूप गोंधळलेले आहेत की तो तिसरा सिंह आपल्याच जातीचा आहे की दुसऱ्याचा? तरुणाची अशी मस्ती त्याला महागात पडू शकते, यात शंका नाही. तरीही न घाबरता, तो सिंहाबरोबर खेळताना दिसत आहे. कधी ते दोन सिंह तरुणाच्या मागे धावताना दिसत आहेत; तर कधी झाडावर चढून हा तरुण सिंहाबरोबर मस्ती करताना दिसत आहे.
(हे ही वाचा : ‘शिकार करो या शिकार बनो’ मृत्यूच्या दारात अडकलेल्या पिल्लाला वाचविण्यासाठी आईने केला सिंहिणीचा मोठा गेम, असं काय केलं?)
येथे पाहा व्हिडीओ
व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी काय म्हणाले?
हा व्हिडीओ एका इन्स्टाग्राम युजरनं शेअर केला आहे. वृत्त लिहेपर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओवर इन्स्टाग्राम युजर्सच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. एका इन्स्टाग्राम वापरकर्त्यानं लिहिलं, “आज लोक व्हायरल होण्यासाठी आपला जीवही देऊ शकतात.” एका युजरनं लिहिलं, “असं कृत्य केल्याबद्दल त्या तरुणाचं खरंच कौतुक केलं पाहिजे.” एका युजरने लिहिलं, “माझा अजूनही विश्वास बसत नाही, तो माणूस आहे.” या व्हिडीओवर अनेकांनी तरुणाला ट्रोल केलं आहे.