Viral Video : सध्या सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अपघाताचे व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. सध्या अशाच एका अपघाताचा व्हिडीओ समोर आला असून यामध्ये एक व्यक्ती मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील थक्क झाले आहेत.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर दोन बसच्या मध्ये अडकल्याचे पाहायला मिळत आहे. पण सुदैवाने त्या व्यक्तीला कसलीही इजा झाली नाही. टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार ही घटना तामिळनाडू येथे घडली असून याचा व्हिडीओ तेव्हापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ एक्सवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती रस्ता ओलांडून बस पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याच वेळी दुसरी एक बस चुकीच्या लेनमधून वेगाने त्याच्याकडे येताना दिसते. ही दुसरी बस पहिल्या बसला घासून जाते आणि महत्वाचे म्हणजे रस्ता ओलांडणारा व्यक्ती या दोन बसत्या मध्ये अडकतो. एक क्षणभर वाटतं की तो व्यक्ती दोन बसच्यामध्ये चेंगरला गेला. पण सुदैवाने या व्यक्तीला कुठलीही इजा होत नाही आणि त्याचा जीव वाचतो.
हा व्हिडीओ शेअर करतान याला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहीलं की, तामिळनाडूच्या पट्टूकोट्टई येथे रस्ता ओलांडताना एक व्यक्ती दोन बसेसच्या मध्ये अडकल. सुदैवाने त्याला कुठलीही दुखापत झाली नाही आणि तो लंगडत निघून गेला.
कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या दुसऱ्या एका व्हिडीओमध्य स्कूटर चालक देखील अशाच एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावला. त्याचा बाईकवरील ताबा सुटल्याने तो पुढून येत असलेल्या पिकअप ट्रकच्या बोनेटवर जाऊन आदळला. ड्रायव्हरने वेळीच ब्रेक दाबल्याने या दुचाकी चालकाचा जीव वाचला. हा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल होत आहे.
दोन्ही व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. नेटकऱ्यांनी थोडक्यात बचावलेले हे दोघे खूपच सुदैवी असल्याची भावना व्यक्त केली आहे . लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.