आजी-आजोबा ते नातवंडे, या तीन पिढ्यातील उबदार नात्यांच्या घट्ट बंधनात घर टिकवून असते. मात्र, आजच्या धकाधकीच्या जीवनात आजी-आजोबांच्या उबदार मायेची जाण प्रत्येकजण विसरून चालला आहे. थकलेल्या हातांनी नातवांना घास भरवणं हे चित्र आता दुर्मिळच होत चालले आहेत. ज्या घरी आजी-आजोबा नसतील तेथे काय, हादेखील प्रश्न आहे. याचंच उत्तम उदाहरण देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुमचे डोळे पाणावतील हे मात्र नक्की.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याच्या आजीला तब्बल ४५ वर्षांनंतर भेटायला गेला आहे. ४५ वर्षाचा कालखंड हा असामान्यच म्हटला पाहिजे. इतक्या वर्षानंतर आजीला भेटायला जात असतानाचा संपूर्ण प्रवास त्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. याप्रसंगी त्याच्या चेहऱ्यावर आजीला भेटायला जाण्यासाठी उत्सुकता स्पष्टपणे दिसून येते. आजीला भेटण्यापर्यंतचे एक एक क्षण त्याने मोबाईलमध्ये टिपले असून तब्बल ४५ वर्षानंतर तो आपल्या आजीला भेटायला जातो. यावेळी इतक्या वर्षानंतर आपल्या नातवाला पाहून त्वचेच्या सुरकुत्या लोंबकळत असलेल्या आजीचा चेहराही आनंदाने उजळून निघाला आहे. ज्यावेळी आजीला तो आपला नातू असल्याचं कळतं तेव्हा त्याला एक घट्ट मिठी मारते आणि ही भेट घडवल्याबद्दल देवाचे आभार मानते. इतक्या वर्षानंतर आपल्या नातवाला मोठं झालेलं पाहून आजीचे डोळे पाणावतात आणि एक एक आठवणी ताज्या होऊ लागतात.
आणखी वाचा : Navratri 2022 : न्यूयॉर्कमध्येही चढला गरब्याचा फिव्हर, टाइम्स स्क्वेअरवर महिलांच्या गरब्याचा VIDEO VIRAL
या भेटीदरम्यान हा माणूस काही जपून ठेवलेल्या गोष्टी आजींना दाखवतो, त्यावेळी पुन्हा भावूक होत आजी आपल्या नातवाला प्रेमाने मिठी मारते आणि डोळ्यात अश्रू तरंगू लागतात. आजी आणि नातवाच्या भेटीचा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा भावूक व्हाल. हा माणूस जेव्हा लहान होता, त्यावेळी या आजीने स्वतःच्या पोटच्या लेकाप्रमाणेच त्याचा सांभाळ केला होता. या व्हिडीओमधल्या आजीचं नाव अॅना असं आहे. इतक्या वर्षानंतर या माणसाने आपला सांभाळ केलेल्या आजीचा शोध घेतला आणि अखेर ४५ वर्षानंतर त्याला यात यश मिळाले. हा सगळा प्रवास त्याने मोबाईलमध्ये कैद करत तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला.
आणखी वाचा : भयंकर वादळानंतरच्या या अद्भूत सूर्यास्ताचा VIDEO VIRAL, अप्रतिम दृश्य पाहून थक्क व्हाल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : Navratri 2022 : मुंबई लोकल ट्रेनमधला गरबा पाहिलात का? हा VIRAL VIDEO तुम्हाला सुद्धा थिरकण्यास भाग पाडेल
GoodNewsCorrespondent नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोक सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ४९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर साडेसहा हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.