Viral Video: सध्या सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक तरुण मंडळी प्रसिद्ध होण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी विचित्र, तर काही थक्क करणारे स्टंट करतात. कित्येकदा ते स्टंट पाहून आपल्याला डोळ्यांवर विश्वासदेखील बसत नाही. कधी बाईकच्या हँडलवर बसून, कधी एका चाकावर बाईक उचलून; तर कधी बाईक हवेत उडवून केलेले अनेक बाईक स्टंट तुम्ही पाहिले असतील. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका सायकलस्वाराचा स्टंटचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. एका तरुणाने सायकलसह पाण्याच्या पलीकडे उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीसुद्धा ठरला आहे.

एक सायकलस्वार अनोखा स्टंट करताना दिसून आला आहे. रस्त्याच्या मधोमध एक छोटी दरी असते. ती छोटीशी दरी ओलांडून त्याला रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जायचे होते. पण, नेहमीप्रमाणे जाण्याऐवजी त्या माणसाने काही तरी वेगळा मार्ग निवडला. त्याने आपल्या सायकलसह दरी ओलांडण्याचा निर्णय घेतला. तर धोकादायक स्टंट करण्यासाठी सायकलस्वाराने प्रथम सायकल उचलली आणि ती एका चाकावर संतुलित केली. तसेच रस्ता ओलांडताना सायकलसह केवढी मोठी झेप घ्यावी लागू शकते याची गणना केली. तरुण हा स्टंट यशस्वीरीत्या पूर्ण करू शकला का? रस्ता ओलांडू शकला का? हे व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

Police found dead body of a man in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? ८ तास तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Man wrote message for his wife in back of the car
नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
rat happy with the rain and see dancing jumping in the rain video viral
पाऊस आला ढिंच्यांग ढिंच्याक! भररस्त्यात आनंदाने उड्या मारत नाचू लागला उंदीर; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO
Eagle carrying an entire adult deer
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं नजर टाकताच हरणानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Leopard Attack On Dog During Night Shocking Video Goes Viral
VIDEO: “वेळ प्रत्येकाची येते, फक्त थोडा संयम” मानगुटीवर बसलेल्या बिबट्याच्या तावडीतून ३ सेकंदात कसा निसटला कुत्रा पाहाच
Lion attack on man shocking video goes viral
‘आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय?’ सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ VIDEO बघून झोप उडेल
Water Increased Many People Drowing In Water Scary Video Viral
मृत्यूपूर्वीचा शेवटचा Video! अचानक पाणी वाढलं, पर्यटकांनी एकमेकांना घट्ट पकडून ठेवलं पण शेवटी…

हेही वाचा…६५ वर्षीय सुरक्षा रक्षकाचे ‘त्याने’ केलं स्वप्न पूर्ण; अयोध्येत घेतलं श्री रामाचे दर्शन; पाहा ‘हा’ हृदयस्पर्शी VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, हा व्हिडीओ स्लो मोशनमध्ये रेकॉर्ड करण्यात आला आहे; ज्यामुळे अशक्य वाटणाऱ्या या स्टंटमध्ये सौंदर्याची भर पडली आहे. सायकलस्वाराने प्रथम सायकल उचलली आणि ती एका चाकावर संतुलित केली. रस्ता ओलांडण्यासाठी सायकलसह केवढी मोठी झेप घ्यावी लागेल याचा अंदाज घेतला. सायकल एका चाकावर संतुलित करून त्याने हवेत झेप घेतली. जर अंदाज चुकला असता तर तरुणाचा पाण्यात पडून अपघातही होऊ शकला असता. पण, तरुणाने हा स्टंट अगदीच सहजतेने पूर्ण करून दाखवला आहे; जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल.

सोशल मीडियावरही हा व्हिडीओ @TheFigen_ एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘एक सायकलस्वार ज्याला भौतिकशास्त्र चांगले समजते’, अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी तरुणाच्या कौशल्याचे कौतुक करत आहेत. तर हा स्टंट पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे; तर अनेक जण तरुणाची चपळता आणि शारीरिक शक्तीचेदेखील कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. एकूणच या व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.